केज तालुक्यातील एका कला केंद्रावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची धाड
महिलांचे व अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या कारणावरून ३६ जणांविरोधात गुणा दाखल
गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी यांनी केज जवळील कला केंद्रावर धाड टाकली. या कला केंद्रावर महिला व अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
धाडीत महिला व पुरुष मिळून ४४ जणांना ताब्यात घेतले होते.
या बाबतची अशी की, दि. ६ जुलै रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाले पोलिसांनी केज बीड रोडवरील महालक्ष्मी कला केंद्रावर दि. ७ जुलै रोजी मध्यरात्री २:३० वाजता छापा मारला. सदर केंद्र हे शासनाचे आदेशाचे उल्लंघन करुन नियमा नुसार दिलेल्या वेळे नंतरही मद्यरात्री २:३० वाजल्या नंतर उशीरा डिजेवर गाणे लावुन रुम मध्ये नृत्य चालु होते. पोलिसांनी कला केंद्राची पाहणी केली असता कला केंद्रात वेगवेगळया चार खोल्यामध्ये काही महिला व अल्पवयीन मुली पुरुषा समोर त्यांच्या सोबत गाण्यावर नृत्य करतांना मिळुन आल्या. पोलिसांनी डिजेवरील गाणे बंद करुन तेथील पुरुष, महिला व आल्पवयीन मुलींना त्यांचे नाव गाव विचारले. अल्पवयीन मुलींना त्याचे वयाचे पुरावे व आधार कार्ड या बाबत सविस्तर चौकशी केली. त्यापैकी एका अल्पवयीन मुलीने तिला पैशाचे आमिष दाखवुन नृत्य करण्यास लावून कला केंद्रा मधील एका खोलीत तिचे लैंगीक शोषण करुन वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे तिने सांगीतले. कला केंद्रात दारु, गुटखा, सिगारेट,तसेच काही आक्षेपार्ह साहित्य मिळुन आले.
त्यानंतर पोलिसांनीअनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष बीड येथील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस आणि महिला तक्रार निवारण व समुपदेशन केंद्राच्या जनाबाई खाडे यांचे समक्ष अल्पवयीन मुलीचा जवाब नोंदविला आहे. या कला केंद्रा वरील धाडीत सर्व संबधीत आरोपीतांवर कायदेशीर कार्यवाही करून एकूण 36 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब रोडे, पोलीस हवालदार राजु वंजारे, पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी, महिला पोलीस हवालदार आशा चौरे, महिला पोलीस हवालदार रुक्मिणी पाचपिंडे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस नाईक विकास चोपने, मल्लिकार्जुन माने, युवराज भुंबे, संतोष गित्ते या पोलीस पथकाने केली.