श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस शाळेची यशाची परंपरा कायम
केज-
श्री छत्रपती शिवाजी विद्यालया आडस येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून, विद्यालयाचा निकाल ९३.९३ टक्के लागला आहे.
विद्यालयातील एकूण १७१ परीक्षार्थीनी आवेदन पत्र भरले होते. यातील १६५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यापैकी १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल ९३.९३ टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रावीण्यासह ७१, प्रथम श्रेणी – ५९, द्वितीय श्रेणी – २१ व तृतीय श्रेणीत ०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून अमित कारभारी नेटके व आदिनाथ महादेव पांचाळ यांनी प्रत्येकी (९३.००%) समान गुण घेऊन प्रथम, शोएब अख्तर शेख (९१.६०%) द्वितीय तर मसीरा रशीद शेख व गौरी संजय आकुसकर (९१.००%) यांनी समान गुण मिळवत तृतीय तसेच रमण सुनील सारडा हा (९०.२०%) गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर, संचालिका आर्चनाताई
आडसकर, ऋषिकेशभैय्या आडसकर, मुख्याध्यापक बी.एस. सोळंके, उपमुख्याध्यापक एस. व्ही. आकुसकर, पर्यवेक्षक एम. बी. लाखे, राजेश देशमुख, व बी. के. पवार व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.
