एन एम एम एस परीक्षेत कु. झोयाफातेमा सय्यद जिल्ह्यात चौथी
गौतम बचुटे/केज :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात एन एमएमएस परीक्षेत साळेगांव ता. केज येथील रहिवाशी असलेली कु. झोयाफातेमा सय्यद ही बीड जिल्ह्यातून चौथी आली आहे.
केज तालुक्यातील साळेगांव येथील सय्यद जुबेर यांची कन्या कु. झोयाफातेमा सय्यद ही स्वामी विवेकानंद विद्यामंदीरची विद्यार्थ्यांनी असून तिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अर्थात एन एमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती साठी पात्र ठरली आहे. ती बीड जिह्यातील सर्वसाधारण गटातून चौथी आली आहे.
तिला या परीक्षेसाठी मुख्याद्यापक तिडके सर, काझी नाजरीन मॅडम व सय्यद शमीम यांचे ही मार्गदर्शन केले. तिच्या या यशा बद्दल हाजी सय्यद नवाब मामु, माजी सरपंच वाहेदाबी सय्यद, माजी सरपंच सय्यद नूर साहेब, डॉ. जे. एन. सय्यद यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
