Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या प्रकरण; आरोपी विरुद्ध बलात्कार पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयत मुलीच्या कुटुंबाने प्रेत ताब्यात न घेण्याचा घेतला होता निर्णय

By May 6, 2023Updated:May 6, 2023No Comments2 Mins Read

अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या प्रकरण;

आरोपी विरुद्ध बलात्कार पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयत मुलीच्या कुटुंबाने प्रेत ताब्यात न घेण्याचा घेतला होता निर्णय

– केज

एका उसतोड  कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर डोळा ठेवुन जबरदस्तीने वारंवार तिच्यावर आत्याचार करणाऱ्या नराधमास केज पोलीसांनी बेड्या ठोकून गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि, यवतमाळ जिल्ह्यातील एका कुटुंबातील पती- पत्नी आपल्या दोन मुलीनां सोबत घेऊन उदरनिर्वाहासाठी ऊस तोडणीचे काम कर्नाटक राज्यात करत होते . ते ज्या टोळीत, ट्रकवर काम करत होते त्याचा मालक केज तालुक्यातील डोका या गावातील सुशील भांगे हा होता .एकुण १७ जन उसतोडणीसाठी कितुर जि. बेळगाव राज्य कर्नाटक येथे सुशील भांगे याच्या ट्रकमधुन गेले त्यानंतर तेथील काम संपल्यानंतर दुसऱ्या यादवाड कारखाण्याला जाण्यासाठी वेळ असल्यामुळे सुशील भांगेने आपल्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी त्या कुटुंबाना घेऊन आपल्या डोका या गावी आनले तेथे १० ते १५ दिवस सोयाबीन काढणीचे काम झाल्यानंतर ते परत आपल्या गावी गेले. त्यानंतर डिसेंबर २०२२ रोजी फिर्यादीच्या जावयासोबत दोन अल्पवयीन मुली पत्नी यांना घेऊन परत कितुर येथे उसतोडणी साठी गेले असता त्यानंतर एकच मुलगी जावई व तिच्या आई सोबत दिसली परंतू एक मुलगी दिसली नाही त्यानंतर कांही वेळाने सुशील भांगे याचा फोन मुलीच्या वडीलांना आला आणी त्याने सांगीतले कि तुमची मुलगी माझ्याजवळ आहे. पती- पत्नी तात्काळ स्थानीक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले परंतु ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करा असे त्यांना सांगीतले.
कांही दिवसानंतर त्याच अल्पवयीन मुलीचा फोन वडिलांना आला तिने सुशील भांगे मला मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ करुण वारंवार जबरदस्ती आत्याचार करत आहे असे सांगीतले. त्यानंतर मुलीचे आईवडील डोका येथे जाऊन आपल्या मुलीला घेऊन आपल्या दुसऱ्या मुलीच्या घरी सोडुन आपल्या गावी गेले असता पाच दिवसानंतर सुशील भांगे तेथे जाऊन मुलीला परत डोका गावी घेऊन आला. परत त्या अल्पवयीन मुलीला त्रास देऊ लागला त्यानतंर या विवेचनेतून सुटण्यासाठी दि ४ मे मंगळवार दुपारी अल्पवयीन मुलीने डोका शिवारातील विहिरीमध्ये उडी घेतली.
विहिरीत बुडत असताना एका महिलेने पाहून तिने स्वतः च्या जिवाची पर्वा न करता त्या अल्पवयीन मुलीला विहिरीतील पाण्याबाहेर काढून तिला उपचारासाठी केज येथील रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. म्हणुन मयत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सुशील भांगे रा डोका ता .केज याच्या विरुद्ध गु.र.न.२५३ कलम ३०६,३७६, (२)(एन),३२३,५०४,४,६ प्रमाणे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या बरोबर आरोपीस केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे करीत आहेत.
या प्रकरणी पिढीत कुटुंबाला लहुजी सेनेने धिर देऊन मदत करण्याचे काम केले.

Post Views: 33

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.