जनाबाई बचुटे यांचे वृद्धापकाळाने निधन
पत्रकार गौतम बचुटे यांचा सांभाळ कलेले मातृत्व हरवले
केज-
जनाबाई शहाजी बचुटे वय वर्षे ८५ रा. साळेगाव यांचे काल दि. १७ वार सोमवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
जनाबाई बचुटे या जुन्या पिढीतील एक कष्टकरी, मेहनती आणि प्रामाणिक महीला म्हणून संपूर्ण गावात परिचित होत्या. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांबरोबरच लहान पणीच आई विना पोरके झालेले आपले दोन पुतण्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून चांगले संस्कार व शिक्षण देत सर्व मुले सुशिक्षित केले आहेत. त्यांच्या मेहनती मुळे सर्व सामान्य कुटुंब नौकरीदार कुटुंब बनले आहे.
त्यांच्या पश्चात
मुलगा रावसाहेब शहाजी बचूटे माजी सैनिक,
अंनत शहाजी बचुटे शेती,
गौतम बचुटे पत्रकार,
बलभीम बचुटे वाहक,
नातू डॉ. आकाश बचुटे, विद्याभुषण, डॉ. विवेक, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने बचुटे परिवारावर दुख्खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व साळेगाव येथील नागरीकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय नेतेमंडळी व पत्रकार यांनी बचुटे कुटुंबाच्या दुख्खात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केली आहे.
