आज्ञात कारची मोटार सायकल स्वारास धडक
मोटार सायकल स्वार गंभीर
केज कळंब रोडवरील आत्ताची घटना
गौतम बचुटे/केज :- तालुक्यातील साळेगाव येथे गालफाडे यांच्या शेता जवळ मोटार सायकलला भरधाव वेगतील कारने समोरून धडक दिल्याने मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर केज च्या दिशेने पळून गेला.
या बाबतची माहिती अशी की दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ४:१५द वा च्या सुमारास कळंबकडून केजकडे जात असलेल्या भरधाव कारने समोरून साळेगांव जवळ गालफाडे यांच्या शेता जवळ एका मोटर सायकलवर धडक दिली. यात मोटार सायकलस्वार नंदकुमार जोगदंड, रा. भाटुंबा ता. केज हा गंभीर जखमी झाला आहे. कार चालकाने मात्र अपघात स्थळावरून पळ काढला.
या अपघाताची माहिती अरुण झाडबुके आणि जय जोगदंड यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशा वरून पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे त्या कारचा शोध घेत आहेत.
