Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

केज-कळंब रोडवर कत्तलखान्याकडे — जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला

By March 17, 2023No Comments2 Mins Read

केज-कळंब रोडवर कत्तलखान्याकडे — जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला

गौतम बचुटे/केज :- कत्तल करण्यासाठी जनावरे घेऊन जाणारा टेम्पो केज पोलिसांनी पकडला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १६ मार्च रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना अशी गुप्त माहिती मिळाली की, साळेगांव येथील आठवडी बाजारातून गोवंशीय प्राणी घेऊन ती कत्तलखान्याकडे घेऊन जात आहेत. त्यांनी तात्काळ या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील त्यांना दिले. त्या आदेशा नुसार पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक शमीम पाशा पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी सापळा रचून दि. १६ मार्च गुरुवार रोजी दुपारी २:०० वा. च्या सुमारास केज-कळंब रोडवरील चिंचोली पाटी जवळ एक आयशर टेम्पो क्र. (एम एच-१२/इ क्यू-६५१८) हा अडवून ताब्यात घेतला. पंचासमक्ष त्याची झडती घेतली. त्या टेम्पोमध्ये पाच बैल आणि दोन गाई असे सात गोवंशीय प्राणी आढळून आले. पोलिसांनी जनावरांचा मालक रा. केज आणि वाहन चालक अमोल रा. नेकनूर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हे गोवंशीय प्राणी हे नेकनूर येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाहन चालकाकडे पशु वाहतूक करण्यासाठीचा परवाना नसताना त्याने जनावरांची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहन व गोवंशीय प्राणी ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई आवेज शेख यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात पशु मालक आणि वाहन चालक यांच्या विरुद्ध गु. र. न. १५३/२०२३ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनिय १९७६ चे कलम ५-अ (१) व ५-अ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पोलीस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 30

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.