ISRO, श्रीहरीकोटा अंतरिक्ष केंद्र सहलीसाठी नाव्होली शाळेची कु. सृष्टी भोसले ची निवड
केज–
विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याद्वारे बीड जिल्ह्यातील जि.प.शाळेतील विज्ञान व गणित विषयांत प्राविण्य असलेल्या 33 विद्यार्थ्यांना श्रीहरी कोटा येथील सहलीसाठी निवडण्यात आले.
या निवडीसाठी इयत्ता५ वी ते ८ वीच्या सर्व जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांची केंद्रस्तर,तालुकास्तर व जिल्हास्तर या वेगवेगळ्या टप्प्यांवर अतिशय कठिण स्वरूपात लेखी व प्रात्यक्षिक परिक्षा घेण्यात आल्या.यासाठी प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे तीन विद्यार्थी निवडण्यात आले.यामध्ये ISRO जिल्हास्तरिय निधड चाचणीमध्ये केज तालुक्यातील तिन शाळेतील विद्यार्थ्यांना निवडण्यात आले असुन यामध्ये १) येवता जि.प. शाळेचा शेळके अजय दगडु २) तांबवा जि.प.प्रा.शाळेचा चाटे निलेश संजय ३) नाव्होली जि.प.मा शाळेची कु. सृष्टी प्रवीण भोसले या गुणवंत विद्यार्थ्यांनी या निवड परिक्षेत यश मिळवले आहे.
जि.प.शाळांमधील या गुणवान विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आणखी आवड निर्माण व्हावी,त्यांना नवनवीन संशोधने समजावीत व प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी श्रीहरी कोटा येथील सहलीचा अनुभव खूप काही उर्जा पुरवणार आहे.
शिक्षक बांधवांनी,प्रशासनातील अधिकारी वर्गानी वेगवेगळ्या टप्प्यांवर या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कष्टांमुळे ही संधी निर्माण झाली आहे.
तीन महत्त्वाच्या ठिकाणी ही वैज्ञानिक सहल जाणार आहे.
१) श्रीहरी कोटा, आंध्रप्रदेश.
काय?कोठे आहे श्रीहरी कोटा…?
श्रीहरिकोटा हे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या किनार्यावरील एक बेट आहे. भारताचे एकमेव उपग्रह प्रक्षेपण केंद्र, सतीश धवन अंतराळ केंद्र (ज्याला SHAR असेही म्हणतात), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे संचालित आहे. ) जेथे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन आणि जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन यांसारख्या बहु-स्टेज रॉकेटचा वापर करून उपग्रह प्रक्षेपित केले जातात तेथे वापरले जाते.
श्रीहरिकोटा येथून GSLV-MkIII रॉकेट प्रक्षेपण
देश :- भारत
राज्य :- आंध्र प्रदेश
जिल्हा:- नेल्लोर जिल्हा
भाषा:- अधिकृत तेलुगु
श्रीहरिकोटा हे पुलिकट तलाव बंगालच्या उपसागरापासून वेगळे करते आणि पुलिकट शहराचे घर आहे. हे आंध्र प्रदेशातील श्री अमरजीवी पोट्टी श्री रामुलु नेल्लोर जिल्ह्यात आहे. सर्वात जवळचे शहर सुल्लुरपेटा आहे. जे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन देखील आहे. चेन्नईपासून त्याचे अंतर ८० किलोमीटर (५० मैल) आहे. सर्वात जवळचे व्यापारी शहर श्री सिटी आहे. हे चेन्नई एक्सप्रेसवेशी देखील जोडलेले आहे..
२) थुंबा,तिरूअनंतपूरम केरळ येथील स्पेस म्युझियम.
३)विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ऍन्ड टेक्निकल म्युझियम बंगळुरू , कर्नाटक.
वरील महत्वाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना या वैज्ञानिक सहलीचा अनुभव मिळणार आहे. केज तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री सुनील केंद्रे तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाहोली, माध्यमिक शाळा येवता व प्राथमिक शाळा तांबवा या शाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षक वृंदाचे खूप खूप अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
नाव्होली जि.प.मा.शाळेत इयत्ता ८ वी वर्गात शिक्षण घेत असलेली कु. सृष्टी प्रवीण भोसले हिने वरील सहलीसाठी यश संपादन करुन तिने शाळेचे, गावाचे नाव केल्याने नाव्होली ग्रामस्थांनी तिचा निकाल लागताच दि.१३ मार्च सोमवारी संध्याकाळी गावातील जागरूक व्यक्तिमत्त्व व सामाजिक कार्यकर्ते अशोक बिक्कड सर यांच्या निवासस्थानी सत्कार कु. सृष्टी प्रवीण भोसले हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी गावचे माजी सरपंच दिलिपराव बिक्कड सर, माजी उपसरपंच पांडुरंग धुमाळ, माजी उपसरपंच शिवाजी देशमुख, हारिदास बिक्कड, शा.व्य.स.माजी अध्यक्ष दत्तात्रय बिक्कड, महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्रिकांत देशमुख, विकास बिक्कड, सतेष बिक्कड, अंगद बिक्कड, अंकूश बिक्कड, अग्रवाल कुरुंद, सुखदेव बिक्कड, बाळासाहेब बिक्कड, गोविंद बिक्कड, रमेश बिक्कड, ईंद्रमोहन घोडके, दादासाहेब बिक्कड,शिवाजी झाडे, बापुराव झाडे, त्याच प्रमाणे या वेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये सौ. सुरेखाताई अशोक बिक्कड, सौ.मोहरबाई बिक्कड, कुसुम बिक्कड, उषाबाई बिक्कड, यांचेसह कु. सृष्टी प्रवीण भोसले हिची आई सौ. राणी प्रवीण भोसले वडील प्रवीण शिवाजी भोसले, आजोबा शिवाजी भोसले आजी सौ. पुष्पाताई भोसले या उपस्थित होत्या. या वेळी कु. सृष्टी भोसले शाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला.कु. सृष्टीचे आई-वडील ग्रामीण भागात राहणारे असून त्यांची परिस्थिती मध्यम स्वरुपाची असल्याने त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले आहे. सृष्टीच्या या यशाबद्दलचे सारे श्रेय नाव्होली शाळेच्या सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना गोसावी सर मा. मु.अ. कांबळे सर यांना जात असुन विशेष करुन या शाळेचे आरकडे सर,दुधाने मॅडम, मुंडे मॅडम यांनी सृष्टीचे या परीक्षेसाठी वेगळे अतिरिक्त तास घेवुन तिला यश मिळवण्यासाठी परिश्रम घेतल्याने त्यांचे सृष्टीच्या आई-वडिलांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत. तिच्या या यशाबद्दल सृष्टीवर अभिनंदनचा वर्षा होत आहे.
