Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

पंकज कुमावत टिमची कारवाई परळी ते गंगाखेड रोडवर ३३ लाखाचा गुटखा पकडला

By March 15, 2023No Comments2 Mins Read

पंकज कुमावत टिमची कारवाई

परळी ते गंगाखेड रोडवर ३३ लाखाचा गुटखा पकडला

गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे रात्रीची गस्त घालीत असताना परळी-गंगाखेड रोडवर एका आयशर टेम्पो मधून गुटखा उतरून घेत असताना त्यांनी पकडला असून गुटखा व वाहतूक करणारा टेम्पो असा ५१ लाख रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी की, दि. १४ मार्च साहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, हेडपोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी दराडे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपणे, वाहन चालक वंजारे हे जिल्हा रात्रगस्त घालीत असताना परळी शहर येथे आले असता सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, एक आयशर टेम्पो क्र. (एच आर६९/ डी-२३०२) मध्ये राजनिवास गुटख्याचा माल भरलेला असून सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणारे रोडवर एन के देशमुख यांचे इंडियन पेट्रोल पंपाचे बाजूला उभा करून त्यातील माल खाली उतरून घेत आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली दोन पंचांना सोबत घेऊन सदर ठिकाणी दि. ५ मार्च मध्यरात्री १२:१५ वा. च्या सुमारास पोलीस पथकाने छापा मारला. त्या ठिकाणी गुटख्याचा माल घेऊन जणारे पिक-अप व टेम्पोतील गुटख्याचे पोते उचलनरे लोक पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. परंतु आयशर टेम्पो व टेम्पो चालक जागीच मिळून आले. त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साबेर सौंदाना सुन्नी रा. सुनेडा ता. पुनाना (हरियाणा) असे सांगितले. त्याचे ताब्यातील आयशर टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला गुटख्याचे ६९ मोठे भोद व सुगंधी तंबाखूचे १४ मोठे भोद असा एकूण ३३ लाख २१ हजार ६०० रू. किंमतीचा गुटखा आणि आयशर टेम्पो असा ५१ लाख ३६ हजार ६०० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. अधिक चौकशी केली असता सदरचा माल इंदोर येथील व्यापाऱ्या कडून आणून परळी येथील व्यापाऱ्यास देणार असल्याचे सांगितले.
या प्रकरणी सहाय्यक फौजदार मुकुंद शामराव ढाकणे यांचे फिर्यादी वरून वरून पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Views: 32

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.