Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

केज येथे दोन मटका बुक्कीवर पोलिसांची धाड गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाची कारवाई

By March 10, 2023No Comments2 Mins Read

केज येथे दोन मटका बुक्कीवर पोलिसांची धाड

गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाची कारवाई

गौतम बचुटे/केज :- केज येथे गुन्हेगार शोध शाखेच्या (डी बी) पथकाने शहरात दोन मटका बुक्क्यावर धाड टाकून दोन मटका बुक्की एजंट आणि दोन मटका चालक यांच्यावर कारवाई केली त्यांच्या कडुन रोख आणि इतर साहित्य मिळून ३३ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

दि. १० मार्च रोजी केज शहरात मटका बुक्की सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हेगार शोध शाखा (डी बी) पथकाला गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक आंनद शिंदे, डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि महादेव बहिरवाळ यांनी केज बस स्टँड जवळील एका पान टपरीवर धाड टाकली,. त्या वेळी कल्याण नावाचा मटका घेत असता एक व्यक्ती होता आणि तो जमा झालेले पैसे मटका बुक्की मालक यांना देत असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच दुपारी २:३० वा. च्या सुमारास या पथकाने केज शहरांतील कानडी रोडवर चालता फिरता मटका घेत असतार्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने हा मटका मालकाचे नाव सांगितले.
या दोन्ही धाडीत पोलिसांनी नगदी रकमेसह ३३ हजार ३७० रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम यादव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या तक्रारी वरून मटका घेणारे यांच्यासह या चार जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Views: 27

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.