सिंघम अधिकारी पंकज कुमावत व दबंग पोलीस पथकाचा बीड मधील पत्त्याच्या क्लबवर छापा
२१ लाखाचा मुद्देमाल आणि २४ जुगारी
पोलिसांच्या ताब्यात !
गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि केज पोलिसांच्या पथकाने बीड शहरातील एका पत्त्याच्या क्लबवर धाड टाकून २१ लाख रु चा मुद्देमाल आणि २४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ९ मार्च रोजी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बीड शहरातील माळीवेस येथे सनी आठवले हा विना परवाना बेकायदेशीर रित्या आपली स्वतःचे फायदा करता आपले राहते घरा समोरील पत्राचे शेडमध्ये काही इसमाना एकत्र बसवुन् जन्ना-मन्नवाच्या जुगारावर पैसे लावून हार जितचा झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळ खेळतो आहे. खात्रीलायक माहिती मिळाल्या वरुन सदरची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिली.
पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व त्यांचे पथकातील केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केजचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर राजू , बालाजी दराडे, सचिन अहकारे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिडे, आशा चौरे, पोलीस नाईक विकास चोपणे, अनिल मंदे, दिलीप गीते, महादेव बहीरवाळ, रामहरी भंडाने, संजय टूले, दीपक जावळे, शफिक पाशा, चालक सहाय्यक फौजदार शेषराव यादव, युवराज भूबे यांनी दि. ९ मार्च रोजी १०:३० वा. सुमारास छापा मारला. त्या ठिकाणी झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणारे लोक पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून क्लब मालक सनी शामराव आठवले यांचेसह २४ जुगार खेळणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून रोख रकमेसह २१ लाख ३५ हजार ९७० एवढा मुद्देमाल जप्त केला. त्या २४ जणांच्या विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक वैभव अनिल सारंग यांचे फिर्यादी वरून शहर पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
