Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

तीन चंदन तस्करांवर केज स्थानिक गुन्हे शाखेची कारवायी

By February 26, 2023No Comments2 Mins Read

तीन चंदन तस्करांवर केज स्थानिक गुन्हे शाखेची कारवायी

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील भोपला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चंदन तस्कर ताब्यात घेतले असून एका मोटार सायकलसह त्यांच्या कडून ५५ हजाराचा मुद्देमाल आणि तस्करीसाठी वापरलेली हत्यारे ताब्यात घेतली आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील भोपला ते वरपगाव दरम्यान चंदन तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुंन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या आदेशाने पोलीस हवालदार मारुती कांबळे, पोलीस नाईक जायभाये, पोलीस नाईक पठाण, पोलीस अंमलदार यादव यांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वा च्या दरम्यान भोपला येथे सापळा लावला असता पोलीस राजेंद्र किसन काळे (रा. इंदिरानगर कळंब) व त्याचे साथीदार फारुक पाशा बागवान (रा. इंदिरा नगर कळंब), दत्तात्रय नारायण तावरे (रा. इंदिरा नगर, कळंब) हे तिघे मोटार सायकल क्र. (एम एच-२५/ ए सी-५६३२) वरून जात असताना आढळून आले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अडवून पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांच्या सोबतच्या पिशवीत चंदन असल्याचे आढळून आले.
त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे चंदन तस्करी करण्यासाठी वापलरी जात असलेले साहित्य मिळून आले.
त्यांच्याकडून पोलिसांनी १२ किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचा गाभा, मोटार सायकल व चंदन तस्करी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ५५ हजार रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या आदेशाने पोलीस हवालदार मारुती कांबळे यांनी राजेंद्र किसन काळे, फारुक पाशा बागवान, दत्तात्रय नारायण तावरे विरुद्ध भा. दं. वि. ३७९, ३४ आणि भारतीय वन अधिनियम ४१, ४२ व महाराष्ट्र वन अधिनियम कलम २६ (एफ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Post Views: 32

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.