Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

सावकारीच्या पाशाने आणि सावकाराच्या धाकाने वैतागून जाळून घेतलेल्या शाम काळे काळेने प्राण सोडले तिघा विरुद्ध गुन्हा दाखल

By February 21, 2023No Comments2 Mins Read

सावकारीच्या पाशाने आणि सावकाराच्या धाकाने वैतागून जाळून घेतलेल्या शाम काळे काळेने प्राण सोडले

तिघा विरुद्ध गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- केज येथे दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वा च्या दरम्यान एका कर्मचाऱ्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या शाम काळे याची १० तासा नंतर मृत्यूशी झुंज संपली आणि त्याने रात्री प्राण सोडले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा करीत असलेला शाम काळे याने एक २४ जानेवारी रोजी महिन्यां पूर्वी दादा मुंडे आणि सचिन सलगर विजय जावळे यांच्या यांच्या कडून १०% व्याजाने ३ लाख रु. व्याजाने घेतले होते. त्या पैशाच्या बदल्यात शाम काळे याला ते तिघेजण त्याचे घर त्यांच्या नावावर लिहून दे. अशी मागणी करीत होते. म्हणून शाम याने दि. १८ फेब्रुवारी त्यांना स्टॅम्प पेपरद्वारे स्वतःचे रहाते घर लिहून दिले होते.
दरम्यान दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० च्या दरम्यान दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांनी त्याला कॉलेजवर जाऊन बळजबरीने त्यांच्या चारचाकी गाडीत बसविले. त्यावेळी शाम हा त्याच्या दुचाकीच्या बाटलीत आणलेले पेट्रोल टाकीत होता. ते अर्धे बाटली भरलेली पेट्रोल त्याजवळ असताना बाटलीसह तिघांनी त्याला बळजबरीने गाडीत बसवून आता घराची रजीष्ट्री आमच्या नावाने करून दे म्हणून दबाव टाकला आणि शाम काळे याला ते तिघे केजकडे घेऊन आले. त्यांच्या त्रासाला कंटाळून व वैफल्यातुन शाम याने काळे याने केजवळ आल्या नंतर गाडी थांबताच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. व्याजाच्या पैशात घर जाण्याच्या भीतीने आणि त्रासातून शाम काळे याने स्वत:ला पेटवून घेतले.
या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी जखमी शाम काळे याचा उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या समक्ष स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जळीत वार्डात मृत्यूपूर्व जबाब नोंदवून घेतला. जबाब नोंदवून झाल्या नंतर दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वा च्या सुमारास शाम काळे याने प्राण सोडले.
दरम्यान शाम काळे यांच्या मृत्यूपूर्व जबाबा वरून केज पोलीस ठाण्यात दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा दं वि३६५, ५०४, ५०६, ३४ आणि महाराष्ट्र सावकारकी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४५ या नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपासासाठी कळंब जि उस्मानाबाद पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

——————————————————————–

मृत्यू झाल्याने गुन्ह्यात वाढ होणार :- शाम काळे याचा मृत्यू झाल्याने दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांच्या विरुद्ध त्यांच्या त्रासाला कंटाळून आणि त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार वाढ होऊ शकते.

Post Views: 43

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.