बचपन प्ले स्कुल आयोजित अँन्युअल डे कार्यक्रम उत्साहात संपन्न
केज-
येथील बचपन प्ले स्कुल आयोजित अँन्युअल डे, स्टार्स आँफ बचपन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यावर विद्यार्थ्यांचे डान्स परफॉर्मन्स सादरीकरण केले गेले. हे सादरीकरण उत्कृष्ट झाले यावेळी उपस्थित पालक, प्रेक्षकांनी विद्यार्थी व स्टापचे कौतुक केले.
यावेळी अध्यक्षस्थानी रोहिणी गजेंद्र गडकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापकी) प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शोभा लटपटे (बालविकास प्रकल्प अधिकारी, केज) तसेच संजय डांगे सर, चिडके सर (उद्योगपती) यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
संस्थेचे संस्थापक दीपक गवळी सर आणि सचिन साखरे सर,
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शकुंतला साखरे,
सहशिक्षिका भक्ती तांदळे, ज्योती डापकर,शीतल करपे शामल गुंड, सोनिया सावंत
मदतनीस हजारे मावशी गायत्री मावशी आदींनी परिश्रम घेतले.
