Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीच्या  विवाह  प्रकरणात माहेर व सासरच्या कुटुंबावर गुन्हा दाखल

By January 30, 2023No Comments3 Mins Read

अल्पवयीन मुलीच्या  विवाह  प्रकरणात माहेर व सासरच्या कुटुंबावर गुन्हा दाखल

गौतम बचुटे /केज :- केज तालुक्यातील पाथरा येथील एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्या प्रकरणी तिचे आई-वडील, सासू-सासरे, नवरा आणि मामा-मामीसह दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १९ जानेवारी रोजी धारूर पोलीस ठाण्यात लक्ष्मी नगर, धारूर येथून वैष्णवी कृष्णा शेटे ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार कृष्णा शेटे यानी दाखल केली होती. त्या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी तपास करून वैष्णवी कृष्णा शेटे आणि तिच्या सोबतचा युवक रोहित लांबूटे (रा. परळी) यांना दि. २७ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री ता. राहता येथून ताब्यात घेतले. त्या दोघांना धारूर पोलीस ठाण्यात आणल्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी आणि महिला पोलीस हवालदार दिक्षा चक्के यांनी तपास केला. तपास दरम्यान वैष्णवी ही ती अल्पवयीन असल्याचे सांगत असल्याने केज तालुक्यातील पाथरा येथील शाळेतून तिच्या जन्म तारखे बाबत शालेय अभिलेख तपासून पाहिले; असता तिची जन्म तारीख ही २४ एप्रिल २००८ असल्याची खात्री झाली.

धारूर येथून बेपत्ता झालेल्या वैष्णवी या युवतीने पोलिसांना सांगितले की, ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना अवघ्या तेराव्या वर्षी दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी तीचे मामा सागर अशोक धोंगडे यांनी त्यांच्या गावी जानेगाव ता. केज येथे तिचे लग्न धारूर येथील कृष्णा वैजनाथ शेटे यांच्या सोबत लावून दिले होते. या बाबी सर्व उजेडात येताच धारूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा बालविवाहाचा प्रकार आणून दिला. त्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या आदेशाने धारूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस जमादार दीक्षा चक्के यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात वैष्णवी शेटे हिचा मामा सागर अशोक घोगडे, आणि मामी (रा. जानेगाव) वडील महारूद्र बबन पांगे, आई सिंधु महारूद्र पांगे, भाऊ ओमकार महारूद्र पांगे, (रा. पाथरा), नवरा कृष्णा वैजनाथ शेटे, सासु शिवकन्या वैजनाथ शेटे, दिर गणेश वैजनाथ शेटे, जाऊ वैशाली गणेश शेटे, रा. धारूर, नवनाथ पटणे (रा. शेलगाव-गांजी) या दहा जणांच्या विरुध्द युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दि. २८ जानेवारी रोजी गु. र. नं. १७/२०२३ बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ चे कलम १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान आई-वडील, मामा-मामी, सासू-सासरे, दीर-जाऊ नवऱ्यासह दहा लोकांच्या विरुद्ध बाल विवाह प्रतीबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.
—————————-
बायको हरवल्याची तक्रार द्यायला गेला अन् बालविवाहाचा गुन्ह्यात अडकला !
कृष्णा शेटे याने त्याची बायको वैष्णवी हरवल्याची तक्रार दाखल केली परंतु त्याने माहीत असूनही अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याचे निष्पन्न होताच त्याच्यासह दहा लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
——————————
बालविवाह आणि शिक्षा मुलीचे वय १८ वर्ष आणि मुलाचे वय २१ वर्ष या पेक्षा कमी वयात त्यांचे लग्न केल्यास बालविवाह प्रतिबंधक कायदा १९२९ नुसार बालविवाह लावून देणारे यांना दोन वर्षांचा कारावास आणि एक लाख रु दंड अशी या कायद्यात तरतूद आहे.
—————————-
रोहित सुटला अन् कृष्णा अडकला :- वैष्णवी आणि रोहित लांबूटे या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी अहमदनगर जिह्यातील निर्मळ पिंप्री येथून ताब्यात घेतले होते; परंतु त्यात कृष्णा शेटे हा बालविवाह प्रकरणात अडकला आहे. म्हणजे रोहित लांबूटे सुटला अन् त्यात कृष्णा शेटे मात्र अडकला आहे.

Post Views: 26

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.