नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला
केज–
केज तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या आशा वाघ यांच्यावर आज दि.२० रोजी अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून प्राण घातक हल्ला केला आहे. सुदैवाने यात त्या बचावल्या असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत.
आज दुपारी जेवन आटोपून त्या तहसील कार्यालयात येत असताना चारचाकी गाडीतून येत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर हा हल्ला केला आहे.
गेल्या काही महीन्यापुर्वी तहसील कार्यालयात त्यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला होता त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
आज त्यांच्यावर झालेल्या पेट्रोल हल्याने खळबळ उडाली आहे.
केज पोलिसांकडून त्यांचा जवाब नोंदणी सुरू असून अज्ञात हल्लेखोर विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.