Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

केज रोटरी तर्फे तालुकास्तरीय शालेय विद्यार्थी नृत्य स्पर्धेचे आयोजन

By January 19, 2023No Comments2 Mins Read

केज रोटरी तर्फे तालुकास्तरीय शालेय विद्यार्थी नृत्य स्पर्धेचे आयोजन

केज:
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने तालुका स्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन 26 जानेवारी 2023 रोजी येथील हनुमान मंदिर (वकिलवाडी) प्रांगणात सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळेत करण्यात आले असून या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, सचिव सूर्यकांत चवरे व संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून केज रोटरी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. याही वर्षी केज तालुक्यातील गुणवंत कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी 5वी ते 10 वी या वयोगटातील विदयार्थी मुलामुलींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रत्येक सहभागी शाळेला त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही फक्त दोन गीतावर डान्स सादर करता येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांना आपली प्रवेशिका गाण्याचे नांव, कलाकारांची नावे, संपर्क मोबाईल क्रमांक इत्यादी माहितीसह 24 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत रो.हनुमंत भोसले- 9423733888, रो सूर्यकांत चवरे- 98606 51023 रो श्रीराम देशमुख- 90757 54444 यांच्याकडे नोंदवावीत. ही स्पर्धा केवळ 5 वी ते 10वी वयोगटातील विद्यार्थ्यांसाठीच आहे. उशिरा येण्याऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकांच्या क्रमवारीनुसार बाहेरगावच्या स्पर्धकांना अगोदर सादरीकरणासाठी संधी दिली जाईल. विजेत्या व उपविजेत्या शाळांना आकर्षक बक्षीषे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. तालुक्यातील चांगल्या कलाकारांना आपल्या शाळेच्या व्यतिरिक्त सार्वजनिक रंगमंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी केज रोटरीचा वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी आपल्या कलाकारांसह सहभाग व्हावे असे आवाहन केज रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 29

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.