बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटना
घरकुल व पगारीचे आमिष दाखवून वृद्ध महीलेवर दोघांचा बलात्कार
तहसीलमधील कारकूनसह एक एजंट पोलिसांच्या ताब्यात
वडवणी/प्रतिनिधी
घरकुल व वृद्धांसाठी असणारी पगार सुरू करण्याचे आमिष दाखवून ओळख करून बळजबरीने वृद्ध यहीलेवर अत्याचार केल्याचे घटना
वडवणी तालुक्यामध्ये घडली आहे.
पिडित वृद्ध महीलेने वडवणी पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दिल्याने त्या दोन्ही आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे समजते.
एका ६८ वर्ष वयाच्या वृद्ध महीलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमचे शेताचा वडवणी येथील न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे मी दर महिन्याला वडवणी येथे येत असते. दिनांक ६ / ०१/२०२३ रोजी वडवणी कोर्टाची तारीख संपल्यानंतर मी व माझे सोबत आमचे गावातील एक व्यक्ती आम्ही हायवे रोडला जात असताना हॉटेलवर चहा घेण्यासाठी थांबलो. तेव्हा तेथे तहसील कार्यालय वडवणीचे बाहेर टेबलावर बसून काम करणारा व त्याचे बरोबर तहसील कार्यालयातील अपंग असलेले साहेब आले माझी ओळख काढून तुम्हाला मी घरकुल देतो व पगार पण सुरू करून देतो, हे माझ्याबरोबर साहेब आहेत सगळं त्यांच्या हातात आहे.तुम्ही कागदपत्रे द्या. असे म्हणल्यानंतर मी माझ्या जवळील आधार कार्ड व पाचशे रुपये यास दिले.व मला दुसऱ्या दिवशी परत येण्यास सांगितले त्यानंतर दिनांक ९ / १/ २०२३ रोजी दुपारी २ – ०० च्या सुमारास वडवणी येथे आले. व तहसील कार्यालयाचे बाहेर ठेबलावर बसलेला आरोपी व्यक्तीकडे यांच्याकडे गेले. त्यानंतर त्याने मला तहसील कार्यालयातील कारकून दुसरा आरोपी घेऊन गेला. तेथे ते साहेब म्हणाले की चिंचवणला सरकारी दवाखान्यात जाऊन साहेबांचे सही घेऊन येऊ त्यानंतर मोटारसायकल घेतली व तो गाडी चालवण्यास बसला त्याचे पाठीमागे ते साहेब बसले व त्याचे पाठीमागे मी बसले त्यानंतर आम्ही तिघे चिंचवण येथील दवाखान्यात गेलो. तेथे डॉक्टरांनी आधार कार्ड नसल्याने प्रमाणपत्र दिले नाही. त्यानंतर मी त्या दोघांच्या सोबत वडवणी कडे परत येत असताना त्या दोघांनी बिचकूलदरा तांड्याचे चढाने मोटार सायकल घेतली. व रोडने पडीक जमिनी जवळ गाडी थांबवली. त्यावेळी सांयकाळचे पाच वाजले असावेत त्याठिकाणी दोघांनी बळजबरीने जिवे मारण्याची धमकी देऊन आळीपाळीने अत्याचार केला कुणाला सांगितले तर जिवे मारण्याची दिली या घटनेने घाबरलेल्या महीलेने १०/०१/२०२३ रोजी वडवणी कोर्टाची तारीख झाल्यानंतर पती पाहुण्याकडे असल्यामुळे तेथे जाऊन त्यांना वरील घटना सांगून वडवणी पोलीस स्टेशनला १२ जानेवारी रोजी येऊन रितसर तक्रार दिली..
68 वर्षीय वृद्ध महीलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ७/२०२३ कलम ३७६,३७६ सिडी,५०६/३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला.व दुसऱ्या दिवशी पहाटे दोन्ही आरोपी तहसील कार्यालयातील कारकून व तो एजंट असलेले आरोपींना अटक केली. आरोपी कस्टडीत असुन या घटनेचा अधिक तपास एपीआय श्री.कांगुणे करत आहेत.