अवैद्य दारू अड्ड्यावर केज पोलिसांची धाड
गौतम बचुटे/केज :-
केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलिसांनी बोरगाव येथील एका अवैद्यरित्या दारू विक्री होत असलेल्या दारू अड्ड्यावर धाड टाकून मुद्देमालासह एकावर कारवाई केली आहे.
बोरगाव ता केज येथे अवैद्य व चोरटी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच दि. १४ जानेवारी रोजी दुपारी पोलीस नाईक राजू गुंजाळ व पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी बोरगाव येथील अवैद्यरित्या दारू विक्री होत असलेल्या दारू अड्ड्यावर धाड टाकली. त्या धाडीत एका किराणा दुकानाच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये देशी व विदेश दारूचा २ हजार ६३० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोरट्या दारू विक्री प्रकरणी सचिन देविदास गायकवाड याच्यावर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १२ (अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
