सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
गौतम बचुटे/केज :- कासारी ता केज येथील शाळेला सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी भेट दिली.
कासारी ता केज येथील भगवान बाबा शिक्षण मंडळ कासारी संचलित क्रांतीवीर आत्माराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय कासारी ता. केज येथील शाळेला आय पी एस अधिकारी पंकज कुमावत यांनी भेट दिली या वेळी त्यांची विद्यार्थी आणि विद्यार्थीनिंशी हितगुज साधले तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
