पंकज कुमावत यांची वाळू तस्करा विरुद्ध मोठी कारवाई
गढी फाट्यावर वाळूने भरलेले हायवा पाठलाग करून पकडला
गौतम बचुटे/केज :- सिंघम सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची जिल्हा आणि जिल्ह्या बाहेरही अवैद्य धंद्या वाल्यावर त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे दहशत निर्माण झाली आहे. गेवराई परिसरात गोदावरी नदी पात्रात अवैद्य वाळू वाहतूक व उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच
आज रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक, पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, सावरगाव तालुका गेवराई येथून गोदावरी नदीच्या पात्रातून अवैद्य वाळू उपसा व चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी कारवाई करून एक वाळूने भरलेले हायवा टिप्पर ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत गेवराई तालुक्यातील सावरगाव येथून गोदावरी नदी पात्रातून अवैध व चोरटी वाळू तस्करी करून त्याची अवैद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहीती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, पोलीस हवालदार राजू वंजारे, पोलीस नाईक विकास चोपणे, नाईक भंडाणे यांनी दि. १४ जानेवारी रोजी रात्री १:३० वा. सावरगाव तालुका गेवराई येथून अवैध वाळूने भरलेला हायवा टिप्पर (एम एच-२३/ए यु- ८०८०) हा बीडकडे येत असताना त्याचा पाठलाग करून गडी फाटा जवळ ताब्यात घेतला. त्या हायवा टिप्पर मध्ये असलेल्या सुमारे सात ब्रास वाळूसह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी हायवा टिप्परवर अवैद्य वाळू चोरी व वाहतूक प्रकरणी गेवराई पोलीसांच्या ताब्यात देऊन पुढील कायदेशीर करण्यात येत आहे.