गोविंदेश्वर प्राथमिक शाळा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी
नांदेड–
गोविंदेश्वर प्राथमिक शाळा नांदेड येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर अध्यक्षस्थानी होते. सर्व प्रथम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील शिक्षक नामवाड माधव, दिगंबर कल्याणकर, शिक्षिका शोभा किडे, संध्या कदम यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विषयी भाषणे केली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या विषयी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच जयंती निमित्त काही विद्यार्थ्यानी राजमाता जिजाऊ यांची वेषभूषा करण्यात आली. तसेच काही विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिगंबर कल्याणकर यांनी केले तसेच आभार सौ. क्षीरसागर यांनी केले.