Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

पाण्याच्या मोटारी चोर आणि विनयभंग प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात चोरांना एक दिवसाची तर रोडरोमिओला दोन दिवसाची पोलीस कोठडी

By January 9, 2023No Comments2 Mins Read

पाण्याच्या मोटारी चोर आणि विनयभंग प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चोरांना एक दिवसाची तर रोडरोमिओला दोन दिवसाची पोलीस कोठडी

गौतम बचुटे/केज :- शेतातील पाण्याच्या दोन मोटारी चोरून नेल्याच्या व अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंगाच्या घटनेतील दोन्ही आरोपींना केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि.५ जानेवारी रोजी केज शिवारातील मानमोडी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील बाबुराव गणपती मोरे यांची ५ एच.पी. विप्रो कंपनीची विहीरी मधील पाण्याची पाणबुडी मोटार आणि आश्रुबा रामभाऊ नींगुळे यांची ५ एच.पी. टेक्समो कंपनीची विहीरीमधील पाणबुडी मोटार ही अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या. त्याची किंमत ३८ हजार ३३५ रु होती. गुन्हा दाखल होताच पोलीस तपासी अधिकारी पोलीस नाईक श्रीकांत चौधरी यांनी तपास करून चोरट्यानी शेतातील जनावरांना खाण्याच्या घासाध्ये त्या दोन मोटारी चोरट्यानी लपवून ठेवल्या असल्याची माहिती मिळताच पोलीस नाईक श्रीकांत चौधरी यांनी लहू चंद्रकांत राऊत, रमेश पांडुरंग राऊत, सूरज नवनाथ राऊत रा. कानडी माळी यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी शेतातून दोन्ही मोटारी ताब्यात दिल्या. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी लहू चंद्रकांत राऊत, रमेश पांडुरंग राऊत, सूरज नवनाथ राऊत रा. कानडी माळी या तिघांना अटक केली आहे.
तर दुसऱ्या एका घटनेत एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या गावातून स्कुटीवर क्लासला येते. दि. ७ जानेवारी रोजी रात्री ७.१५ वा. सुमारास सदरची ती अल्पवयीन मुलगी ही शिकवणी वर्ग संपल्या नंतर स्कुटी वरून गावाकडे जात असताना एकाने तिचा पाठलाग करुन तिला शहरातील शाळे जवळ गाठुन तिची छेड काढली. त्यातील आरोपी याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गु. र. नं. ७/२०२४ भा. दं. वि. ३५४ (ड) आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी त्याला अटक केली आहे.

मोटारी चोरांना एक दिवसाची दि. १० जानेवारी पर्यंत तर छेडछाड प्रकरणातील आरोपीला दि. ११ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Post Views: 30

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.