Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

किशोरवयीन मुलांनी स्वतःच्या आरोग्यासह अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता- प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर   किशोरवयीन विद्यार्थी मार्गदर्शन व चर्चासत्रात

By December 30, 2022No Comments2 Mins Read

किशोरवयीन मुलांनी स्वतःच्या आरोग्यासह अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता- प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर

  किशोरवयीन विद्यार्थी मार्गदर्शन व चर्चासत्रात

आडस-
किशोर वयातील मुलांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करून आनंदी जीवन जगण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांनी सोमवार (ता.२६) रोजी आडस येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या ‘किशोरवयीन विद्यार्थी मार्गदर्शन व चर्चासत्रात’ बोलताना केले.
तालुक्यातील आडस येथील‌ श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शालेय मुले व मुलींसाठीच्या ‘किशोरवयीन समस्या व उपाय’ या विषयावरील मार्गदर्शन व चर्चासत्र मुख्याध्यापक पी. एम. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडले. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर व सुषमा आकुसकर हे तर उपमुख्याध्यापक श्रीधर गाठाळ, रामदास साबळे व पर्यवेक्षक श्रीकिशन आकुसकर हे उपस्थित होते. किशोरवयीन मुले व मुलींसाठीचे मार्गदर्शन व चर्चासत्र स्वतंत्रपणे घेण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सौदागर म्हणाले, या वयात होत असलेल्या शारीरिक व मानसिक बदलांच्या काळात मुलांनी येणाऱ्या अडचणी कुटुंबातील ज्येष्ठांना व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून त्याचे निराकरण केले पाहिजे. सकस व संतुलित आहार घेऊन या काळात चांगल्या सवयी अंगीकारून आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तर सुषमा आकुसकर यांनी मुलींनी कोणताही संकोच न बाळगता आरोग्य विषयक समस्या डॉक्टरांना सांगून त्यावर वेळीच उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन सुरेश शिनगारे यांनी केले तर साजिद शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री कोकाटे, अर्चना भालेकर-शेंडगे, परवीन शेख, अर्चना साबळे, निता चव्हाण तसेच छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी शाळेतील किशोरवयीन मुले व मुली विद्यार्थी उपस्थित होते.

Post Views: 31

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.