वृद्धांच्या हातातील अंगठी आणि रोख २० हजार लांबवले
गौतम बचुटे/केज :- शेतात काम करीत असलेल्या वृद्ध व्यक्तीच्या हातातील अंगठी आणि रोख वीस हजार रु. लांबविली आहेत.
या बाबतची माहिती अशी की, बुधवार दि. २८ डिसेंबर रोजी साळेगांव ता. केज येथे केज-कळंब रस्त्यावरील वीज उपकेंद्राच्या जवळ गोरोबा सोपान शेरखाने वय (६५ वर्ष) हे त्यांच्या शेतात काम करीत होते. त्या वेळी दोन मोटार सायकलवरून चौघे अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आले. त्यांनी गोरोबा शेरखाने यांच्या बोटातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व खिशातील २० हजार रु. घेऊन मोटार सायकली वरून पळून गेले. या घटनेत सोन्याची अंगठी आणि रोख २० हजार रु. असे एकूण ४५ हजार रु अज्ञात चोरट्यानी लांबविले आहेत.
