ग्रा. पं. निवडणुकीत काकाच्या सत्तेला सुरूंग लाऊन पुतण्याने मिळवली सत्ता
ग्रामपंचायत सरपंच पदी प्रेरणा काळे तर उपसरपंचपदी सुमित्रा चौरे यांची निवड
केज
तालुक्यातील जिवाचीवाडी ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेली असून जनतेतून निवडून आलेल्या सरपंच प्रेरणा दिपक काळे यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदी सुमित्रा चौरे यांची निवड करण्यात आली. यावेळी बालाप्रसाद भुतडा , युवा उद्योजक बंडू पाटील चौरे यांच्या नेतृत्वाखाली पंकजाताई मुंडे यांची आली आहे .
पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बालाप्रसाद भुतडा व बंडू पाटील चौरे यांच्या गटाने निवडणूक मधे विजय मिळवत सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी झाली जनतेतून प्रचंड मतानी प्रेरणा दिपक काळै यांनी विजय मिळवला तर उपसरपंच निवडीत सुमित्रा बाबासाहेब चौरे यांची निवड झाली याचा आनंदोत्सव साजरा केला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चौरे , डिंगाबर चौरे , कुसुम कुटे , राधाबाई चौरे यांच्या मतानी उपसरपंच पदाची निवड झाली . यावेळी पॕनल प्रमुख बंडे चौरे , चिंतामण चौरे , बालाप्रसाद भुतडा , तुळशीराम तोंडे , मुरली चौरे , डॉ श्रीधर चौरे , महादेव चौरे , जि बी गदळे , राजेभाऊ चौरे , बाबासाहेब चौरे , सत्यनारायण चौरे , बाबू चौरे , अंकुश चौरे , श्रीराम चौरे , श्रीराम कुटे , रामकिसन चौरे , यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते .
