Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

दारूच्या नशेत दारुड्याने केला दारुड्या मित्राच्या डोक्यात सत्तूरचा जीवघेणा वार

By December 28, 2022No Comments2 Mins Read

दारूच्या नशेत दारुड्याने केला दारुड्या मित्राच्या डोक्यात सत्तूरचा जीवघेणा वार

गौतम बचुटे/केज :- दोन दारुड्या मित्राने एकत्र सोबत दारू पिऊन चिकन घेण्यासाठी चिकनच्या दुकानावर गेल्या नंतर क्षुल्लक कारणा वरून दारूच्या नशेत त्यांचे एकमेकां सोबत भांडण झाले. त्या भांडणात एकाने चक्क दुसऱ्याच्या डोक्यात चिकन कापण्याच्या सत्तूरने जीवघेणा वार केला. मात्र सुदैवाने मोठी जखम होऊनही जखमीचा जीव वाचला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दिगंबर मारुती राऊत व अशोक उर्फ भैय्या सुरेश राऊत दोघे रा. साळेगाव ता. केज येथील रहिवाशी आहेत. दोघेही दारू पिण्याच्या सवयीचे आहेत.
मंगळवार दि. २७ डिसेंबर रोजी दोघांनी सोबत मद्यपान केले. त्या नंतर दोघे शेख सम्मद यांच्या चिकनच्या दुकानावर चिकन विकत घेण्यासाठी गेले. त्यावेळी शेख सम्मद हे दुकान उघडे ठेवून बाहेर गेले असल्याने अशोक उर्फ भैय्या राऊत हा दुकानात गेला आणि तो मटण तोडण्याच्या सत्तूर चिकनचे पाय तोडू लागला. तेव्हा दिगंबर राऊत हा अशोक राऊत याला तसे करू नको म्हणाला. त्या क्षुल्लक कारणा वरून त्यांच्यात भांडण झाले आणि अशोकने त्याच्या हातातील धारदार सत्तूरने दिगंबर राऊत याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात वार केला. या भांडणाच्या वेळी तेथे हजर असलेले रोशन सरवदे व रामेश्वर शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडविले. त्या नंतर जखमी दिगंबर राऊत याच्या पत्नीने रिक्षा चालक मनोज घेवारे यांच्या रिक्षाने प्रथमोपचारसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सत्तूरच्या वारामुळे दिगंबर राऊत याच्या डोक्यात बारा टाके पडले आहेत. मात्र आता त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून त्याचा जीव वाचला आहे.
दरम्यान पुढील उपचारासाठी दिगंबर राऊत यास अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
दिगंबर राऊत याच्या फिर्यादी वरून अशोक उर्फ भैय्या सुरेश राऊत याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५९६/२०२२ भा. दं. वि. ३२६, ३२३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी सहाय्यकपोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 32

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.