Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
निवडणूक

थोड्याच वेळात ठरणार गावचा कारभारी कोण

By December 20, 2022No Comments2 Mins Read

थोड्याच वेळात ठरणार गावचा कारभारी कोण

केज :-
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल आज जाहीर होणार असून गावचा कारभारी कोण हे आज जाहीर होणार आहे. जनतेतून सरपंच निवड असल्याने ही निवडणूक चांगलीच अटीतटीची पाहायला मिळाली, सरपंच पदासाठी एकाच पक्षातील अनेकांनी मिच सरपंच होणार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले त्यामुळे तालुक्यातील राजकीय नेत्यांनी वेट अँण्ड वाँच ची भुमिकेत राहुन आजच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. जास्तीत जास्त सरपंच आपल्याकडे खेचण्यासाठी रणनीती आखून ठेवत असल्याचे दिसून येत आहे.

केज तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यात ८४.१३ % मतदान झाले. निवडणुकीत मतदारानी रांगा लावून मतदान केले. यावेळी वृद्ध, दिव्यांग व्यक्तींनी मतदान केले.

केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतिच्या सरपंच व सदस्यासाठी आज दि. १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. या पैकी धर्माळा आणि आनेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ११ ग्रामपंचायती या अंशतः काही जागेसाठी बिनविरोध झाल्या आहेत. त्यात केकत सारणी, पिसेगाव, कुंबेफळ, राजेगाव, सारुळ, जोला, माळेवाडी, सादोळा, औरंगपूर, शेलगाव-गांजी आणि हादगाव (डोका) ही गावे आहेत. एकूण चार सरपंचाच्या निवडी बिनविरोध झाल्या तर ३७ सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ६४ ग्रामपंचायतीच्या ६२ सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीसाठी २०८ प्रभागाची निवडणूका झाल्या. त्यासाठी सरपंच पदासाठी एकूण १७३ उमेदवार रिंगणात होते. तर सदस्य पदासाठी ११८४ उमेदवार आपले भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
दरम्यान या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १ लाख १ हजार ५४८ मतदारां पैकी ८५ हजार ४३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. त्या मध्ये ३९ हजार ५७० स्त्री मतदार आणि ४५ हजार ८६० पुरुष मतदारांचा समावेश आहे. ६४ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत बावची येथे ९२.५३% मतदान झाले बावची येथील ५४९ मतदार पैकी ५०६ मतदारांनी आपला हक्क बजावला तर त्या तुलनेत सारणी (सांगवी) येथे सर्वात म्हणजे ७२.६० % मतदान झाले. सांगवी येथील १२१९ मतदारां पैकी ८८५ मतदारांनी हक्क बजावला.

Post Views: 122

Related Posts

बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान

May 14, 2024

पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे– पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल– पालक मंत्री धनंजय मुंडे

March 24, 2024

प्रा.किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

January 18, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.