केज तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. मतदारानी रांगा लावून मतदान केले यावेळी वृद्ध, दिव्यांग व्यक्तींनी मतदान केले.
केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतिच्या सरपंच व सदस्यासाठी आज दि. १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. या पैकी धर्माळा आणि आनेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ११ ग्रामपंचायती या अंशतः काही जागेसाठी बिनविरोध झालक्या आहेत. त्यात केकतसारणी, पिसेगाव, कुंबेफळ, राजेगाव, सारुळ, जोला, माळेवाडी, सादोळा, औरंगपूर, शेलगाव-गांजी आणि हादगाव (डोका) ही गावे आहेत. एकूण चार सरपंचाच्या निवडी बिनविरोध झाल्या तर ३७ सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ६४ ग्रामपंचायतीच्या ६२ सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीसाठी २०८ प्रभागाची निवडणूका झाल्या. त्यासाठी सरपंच पदासाठी एकूण १७३ उमेदवार रिंगणात होते. तर सदस्य पदासाठी ११८४ उमेदवार आपले भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
दरम्यान केज तालुक्यात आज शांततेत मतदान पार पडले. दरम्यान काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपून गेल्या नंतरही उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
——————————–
नव वधू-वराने बजावला मतदानाचा हक्क
——————————–
१८ डिसेंबर रोजी साळेगांव ता केज येथील संजय दादाराव कळसकर यांचे चिरंजीव रामेश्वर उर्फ नामु यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील वासुदेव भगवान राशकर यांची कन्या वैष्णवी हिच्याशी दुपारी १२:३१ वा शुभमुहूर्तावर वऱ्हाडी मंडळी यांच्या उपस्थितीत देव ब्राह्मनांच्या साक्षीने पार पडताच नववधू-वरच्या डोक्यावर मंगलाष्टका नंतर अक्षता पडल्या नंतर अग्नी देवतांच्या साक्षीने त्यांनी सप्तपदी पार पडताच तात्काळ त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब आणि श्रीमंतांना प्रत्येकाला दिलेल्या एक मत आणि त्याचे समान मूल्य दिले आहे. ते साळेगांव येथे वधू वरांनी लग्नाच्या मंगल अष्टका झाल्या नंतर डोईवर आशीर्वादाचा अक्षता पडताच चि. नामदेव आणि चि. सौ. कां. वैष्णवी साळेगांव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बुलेट वरून येत आपला मतदानाचा हक्क बजावला.