Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
निवडणूक

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेद्वारांनी मतदान मशिनची पूजा-अर्चा करू नये — तहसीलदारांना निवेदन

By December 14, 2022No Comments2 Mins Read

गैरप्रकार निदर्शनास येताच अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेद्वारांनी मतदान मशिनची पूजा-अर्चा करू नये
— तहसीलदारांना निवेदन

केज :- ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक उमेदवार हे जमाव जमवून मतदान यंत्राची पूजा-अर्चा करून निवडणूक आचार संहितेचा भंग करीत असल्याने केज तालुक्यातील हा बेकायदेशीर प्रकार बंद करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीचे मतदान असून त्या पैकी दोन ग्रामपंचायती यांनी निवड ही अविरोध झालेली आहे. उर्वरित ६४ ग्रामपंचायतीसाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या मतदाना दिवशी मतदान सुरु होण्या पूर्वी विविध पार्ट्यांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकत्र येऊन मतदान यंत्राची गुलाल, हार घालून नारळ फोडून पूजा करतात. तसेच मतपेटी व यंत्र पुजनाच्या निमित्ताने २०-२५ जण एकत्र येत मतदान कक्षात प्रवेश करतात. दिवसभर विनापरवाना मतदान केंद्र आणि परिसरात ये -जा करतात.
दिवसभर मतदान केंद्रात आलेल्या मतदारास दमदाटी करुन त्याचे मतदान स्वत: करतात. तसेच काही लोक गावातील मतदारावर मतदान कक्षात व बाहेर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुक्त वातावरणात निपक्ष पद्दतीने मतदान होत नाही.
त्यामुळे मतदान यंत्र व मतदान पेटी यांची पूजा करण्यात येऊ नये. अशी मागणी केज तालुक्यातील सातेफळ येथील सुमारे पावणे दोनशे मतदारांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार केज यांच्याकडे केली आहे. याच्या प्रती जिल्हाधिकाती, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्य पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक याना दिल्या आहेत.

छुप्या कॅमेऱ्याद्वारे आणि मोबाईल द्वारे मतदानाचे चित्रीकरण केल्यास होणार सक्त कारवाई :-
——————————-
मतदाना दरम्यान काहीजण छुवया कॅमेऱ्याने किंवा मोबाईलने मतदानाचे चित्रीकरण करून आचार संहितेचा भंग करतात अलिकडे सोशलमिडीयाचे तरूणात फँड वाढल्याने असे प्रकार घडत असल्याचे भिती व्यक्त होत आहे.

—————————————

गैरप्रकार आढळून आल्यास नियमानुसार कारवाई होणार — तहसीलदार मेंडके
——————————
मतदान केंद्रावर मतदान पेटीचे, मतदान यंत्र किंवा मतदान करतांना व्हीडिओ चित्रिकरण असे प्रकार आढळून आल्यास मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
— दुलाजी मेंडके
तहसीलदार, केज
—————————————–

Post Views: 34

Related Posts

बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ केज मतदारसंघात 70.31℅ मतदान

May 14, 2024

पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे– पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल– पालक मंत्री धनंजय मुंडे

March 24, 2024

प्रा.किरण पाटील यांनी गोपीनाथ गडाचे दर्शन घेऊन केली प्रचारास सुरुवात

January 18, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.