Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
कृषी

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

By November 29, 2022No Comments2 Mins Read

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

शॉक लागून बैल दगावल्या प्रकरणी व बियाणे न उगवल्या प्रकरणी शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

गौतम बचुटे/केज :-  युसुफवडगाव येथील एका शेतकऱ्याचा वीज वाहक तार तुटून ती बैलाच्या अंगावर पडल्याने शॉक लागून बैल दगावल्या प्रकरणी आणि दुसऱ्या एका घटनेत सोयाबीनचे बियाणे उगवल्या प्रकरणी झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. १० डिसेंबर २०१९ रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील बाळा रामभाऊ निकम यांच्या शेतातून गेलेल्या वीज वाजींनीची विद्युत वाहक तार तुटून ती बैलाच्या अंगावर पडली त्यात तो बैल दगावला त्यामुळे त्यांचे नुकसान झाले त्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे नुकसान भरपाईसाठी ॲड. हनुमंत जाधव यांच्या मार्फत दादा मागितली होती. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि उपलब्ध कागदपत्रे व पुराव्या आधारे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीमती मेघा गरुड व सदस्य श्रीमती अपर्णा दिक्षीत आणि श्रीधर कुलकर्णी यांनी त्या शेतकऱ्यास ५० हजार रु. नुकसान भरपाई आणि आर्थिक व मानसिक त्रासापोटी ३ हजार रु व दाव्याच्या खर्चापोटी २ हजार रु असा ५५ हजार रु. अशी नुकसान भरपाई देण्यात यावी. असा आदेश दिले आहेत. तसेच निकाल लागल्या पासून नुकसान भरपाईची रकमेवर ८ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच दुसऱ्या प्रकरणात युसुफवडगाव येथील सन २०२० च्या खरीप हंगामासाठी किरण आत्माराम जावळे आणि आशिष आत्माराम जावळे या दोन भावांनी केज येथील संतोष कृषी सेवा केंद्रातून ग्रीन सिड्स कंपनीचे ३३४४ वाणाचे १३ बॅग सोयाबीन ज्याची किंमत ३२ हजार ८२ रु. चे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यांनी पूर्व मशागत करून पेरणी केली. परंतु ते बियाणे व्यवस्थित उगवले नाही. म्हणून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
त्या बाबत त्यांनी ग्रीन सिड्स बियाण्याची कंपनी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि सदर बियाणे खरेदी केलेल्या कृषी सेवा केंद्राला कळविले. या बाबत त्यांनी ॲड. हनुमंत जाधव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार क्र. २०५/२०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून व उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी व सदस्य श्रीमती मेघा गरुड, श्रीमती अपर्णा देशमुख यांनी असा आदेश दिला आहे; की, सदर ग्रीन सिड्स कंपनीने तक्रारदाराला ५ लाख ३४ हजार ८२५ रु. नुकसान भरपाई द्यावी. तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार रु. आणि दाव्याच्या खर्चापोटी एक हजार रु. नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निकाल लागल्या पासून नुकसान भरपाईची रकमेवर ८ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.
या दोन्ही निकालामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून बियाणे उत्पादक कंपनी व वीज वितरण कंपनीला चपराक बसली आहे.

Post Views: 152

Related Posts

शेतकर्यांच्या उन्नतीसाठी केज कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर- रमेशरावजी आडसकर

October 17, 2023

केज कृषी उत्पन्न बाजार समिती व आत्मा संयुक्तरित्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

October 17, 2023

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या – बाळासाहेब ठोंबरे

December 27, 2022
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.