केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे स्पेशल कव्हरेज
प्रशासन झाले सज्ज
नशीब अजमवण्यासाठी तरुणाईची धडपड
केज / प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२२ चा नुकत्याच महाराष्ट्रात ७७५१ ग्रामपंचायतीसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुका घेणे क्रमप्राप्त असल्याने केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीपैकी पहिल्या टप्प्यात ६६ ग्रामपंचायतीच्या निवणुका घेण्यात येत असल्याने या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असुन त्याबाबतचे नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी कालपासून सुरुवात झाली आहे. पहील्या दिवशी अकरा अर्ज दाखल झाले आहेत या संपूर्ण निवडणूक कार्यासाठी क प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन केजचे तहसीलदार तथा मा.निवडणूक निर्णय अधिकारी मेंढके यांनी केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२२ जाहीर केला असुन यात ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२या कालावधीत मुदत संपणाऱ्या,नवनिर्मित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या अशा सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुका घेणे क्रमप्राप्त असल्याने केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीपैकी ६६ ग्रामपंचायतच्या निवडणुका सध्या होत असुन आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यातील प्रशासन परिपूर्ण सज्ज झाले आहे. गेल्या पंचवार्षिक प्रमाणेच या वेळेसची निवडणूकही पारदर्शक पणे व संगणक प्रणाली द्वारे होत असुन सरपंचपदाची निवड ही थेट जनेतुन होत असल्याने गावागावात सरपंच साठी रस्सीखेच सुरु झाली असून बैठका, चर्चा, यावर सद्या जोर दिसत आहे. तर बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली असुन तहसीलदार यांनी १८ नोहेंबर २०२२ शुक्रवार रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केल्यानुसार या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी व स्विकारण्यासाठी आज पासुन म्हणजे दि.२८ नोहेंबर २०२२ (सोमवार)
ते
दि.२ डिसेंबर २०२२ (शुक्रवार) सकाळी ११:०० वाजले पासून दुपारी ३:००वाजेपर्यंत राहणार असुन तर नामनिर्देशनपत्राची छाननी दि.५ डिसेंबर २०२२ सोमवार सकाळी ११:०० वाजलेपासुन छाननी संपेपर्यंत सुरु राहणार आहे. सदरील निवडणुकीचे दाखल झालेले व छाननी झालेले नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी बुधवार दुपारी ३:०० वाजेपर्यंत असणार आहे.तर याच दिवशी म्हणजे दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३:००वाजलेच्या नंतर निवडणूक चिन्ह नेमुन देण्यात येणार आहे. तसेच याचवेळी निवडणूक लढवणाऱ्या अंतरीम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर मतदान दि. १८ डिसेंबर २०२२ (रविवार) रोजी सकाळी ७:३० वाजले पासून ते सांयकाळी ५:३० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.या निवडणुकीची मतमोजणी व निकाल दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी घोषीत होणार आहे. तर या निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना मा.जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी (शुक्रवार) पर्यंत प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच या मतदानासाठी २१२ बुथ संख्या ठरवण्यात आलेली असुन या निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाकडून केंद्राध्यक्ष म्हणून २३५ , मतदान अधिकारी म्हणून २३५ तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून २८ व ईतर पदाधिकारी मिळून एकुण ९७५ एवढे मनुष्यबळ राहणार आहे. अशी माहिती केज तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तथा निवडणूक विभागाचे मा. लक्ष्मण धस यांनी दिली आहे.
दरम्यान बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीला कालपासून पासुन प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली असुन या निवडनुकीत जेष्ठांनी पडद्यामागची भुमिका साकारत तरुणाईला संधी देत येत असल्याचे चित्र सद्या तरी पहावयास मिळत आहे. गेल्या पंचवार्षिक प्रमाणेच या वर्षी देखील सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून होणार असल्याने गावागावात सरपंच होण्यासाठी अनेकजण गुढघ्याला बाशिंग बांधुन बसले आहेत. या अटितटीच्या निवडणुकीत बाजी कोण मारणार ? कोण होणार गावचा कारभारी ? यसाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कामाला लागले आहेत.