पुतण्याने केला प्राणघातक हल्ला ; चुलता ठार चुलती गंभीर जखमी
आरोपी गजाआड
नेकनूर, लिंबागणेश जवळील मुळकवाडी येथे शेतीच्या वादातून पुतण्या रोहिदास विठ्ठल निर्मळ याने केलेला हल्ल्यात चुलते बळीराम मसाजी निर्मळ वय 80 हे ठार झाले असून त्यांच्या पत्नी केसरबाई बळीराम निर्मळ वय 70 यांची प्रकृती गंभीर आहे आरोपीला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुळकवाडी येथे शनिवारी सकाळी शेतीच्या वादातून रोहिदास विठ्ठल निर्मळ याने चुलताचुलतीवर प्राणघातक हल्ला केला यामध्ये बळीराम निर्मळ आणि त्यांच्या पत्नी केसरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर उपचार सुरू असताना बळीराम निर्मळ यांचा मृत्यू झाला असून केसरबाई निर्मळ यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतीच्या वादातून ही घटना घडली असल्याचे बोलले जात असून सकाळी सात वाजता त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली आहे. घटनास्थळी एपीआय शेख, पीएसआय जाधव, पानपाटील लिंबागणेश चौकीचे कॉन्स्टेबल सचिन डिडोळ यांनी धाव घेतआरोपीला ताब्यात घेतले .