- *रोड रोमिओ आणि मजनूच्या दिमतीला केज पोलिसांची तगडी टीम*
*मुलींना त्रास देणाऱ्या टग्यांची बिनधास्त माहिती द्या; त्याचा तात्काळ बंदोबस्त होईल*
— सपोनि शंकर वाघमोडे
गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी रोखणे आणि जनासामान्यांना पोलीस हा आपला वाटावा. यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेले केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी आता शाळा, महाविद्यालये आणि आता शहरातील कोचिंग क्लास व शिकवण्या वर लक्ष केंद्रित केले आहे. मुलींना त्रास देणाऱ्या व त्यांचा पाठलाग करणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना दिल्यास त्याचा बंदोबस्त केला जाईल. माहिती देणारांचे नावही गुप्त ठेवले जाईल. असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे. त्यांचे कर्मचारी हे शहरातील क्लासेसला भेटी देणार आहेत.
केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी असे कळविले आहे की, केज शहेअतील सर्व क्लासेस ला पोलीस भेट देणार आहेत जर तेथील विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी यांनी कोणतीही दखलपात्र तक्रार दिल्यास त्याची दखल घेण्यात येईल. अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. मुलींच्या शिक्षणाची मार्ग सोयीस्कर व्हावा आणि कोणत्याही विद्यार्थिनीला शिक्षणाच्या बाबतीमध्ये काहीही अडचण होऊ नये. हा त्या मागचा सरळ उद्देश आहे. पालकांच्या मनाप्रमाणे या विद्यार्थिनींचे भाऊ म्हणून पोलीस काम करत आहेत. त्यासाठी सर्वां सुजाण नागरिकानी सहकार्य करावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
