Author: विजयराज आरकडे

जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन साहेब यांच्या हस्ते क्रिडा प्रशिक्षक विनोद गुंड सर सन्मानित बीड- बीड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवर क्रीडा संघटक व क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संयोजक म्हणून कामगिरी केल्याबद्दल अनेकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये केज येथील जेष्ठ खेळाडू तथा क्रिडा प्रशिक्षक विनोद गुंड सर यांचाही दि.29 ऑगस्ट 2025 या राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त बीडचे जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर साहेब प्रा. जनार्दन शेळके सर वया कार्यक्रमाला बीड जिल्हातील खेळाडू…

Read More

केज-बीड मार्गावरील उमरी टोल नाका सुरु; केज तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी पास चा लाभ घ्यावा.- सुमंत धस केज ते बीड रस्त्यावर नव्याने कार्यान्वित झालेला टोल नाका सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू आहे. या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आता आपला ‘स्थानिक पास’ अनिवार्यपणे घ्यावा, अन्यथा त्यांना प्रत्येक वेळी टोल भरावा लागेल.एक बाजूच्या प्रवासाला चार चाकी वाहनाला ८५ रुपये मोजावे लागणार आहेत,दिवसातून अनेक वेळेस टोल वरून प्रवास करणारे अनेक वाहने केज तालुक्यातील आहेत त्या मुळे पास नसेल तर त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे,पैश्यांची बचत व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ३५० रुपयांचा महिन्याचा पास काढावा. तसेच रोड वर कुठे अपघात झाला तर जखमींना…

Read More

अक्षय जाधव यांचे नीट पीजी मध्ये घवघवीत यश केज – केज येथील भूमिपुत्र अक्षय अविनाश जाधव यांनी नीट पीजी करिता ऑल इंडिया रँक 1569 क्रमांक मिळवला आहे. संभाजीनगर घाटी इथे शिक्षण घेताना ही रँक मिळवली आहे. पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी ही गुणवत्ता महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल खा रजनीताई अशोकराव पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील माऊली विद्यापीठाचे सचिव आदित्य दादा पाटील,प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी अजितदादा पवार यांना रमेशराव आडसकर यांनी दिले निवेदन; मुंबई- मागील काही दिवसांत बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे सर्व पिके वाहुन गेले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. केज तालुक्यात शेतांना अतिवृष्टीचा अधिक फटका बसला आहे. रमेशराव आडसकर यांनी स्वतः शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून शासन दरबारी आपण भेटून शेतकर्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीची माहिती देऊन शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. शेतकर्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन अजितदादा पवार…

Read More

आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते मेंढपाळांच्या मेंढ्यासाठी औषधी व लसीचे मोफत वाटप मेंढपाळानी मेंढ्यासाठी मोफत औषध,लसीचा लाभ घ्यावा—प्रकाश जाडकर केज- बीड जिल्ह्यात सततचा पाऊस चालू असल्यामुळे बीड जिल्ह्यातील मेंढपाळांच्या मेंढ्यांना साथ रोगांचे आजार होत आहेत. केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाला तातडीच्या सूचना देऊन मेंढ्यांना रोग प्रतिबंधक लस उपलब्ध करून मेंढपाळांच्या मेंढ्यांना लसीचा डोस पाजून आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते कुंबेफळ येथे झाला यापूर्वी मेंढपाळांना खाजगी रुग्णालयातून औषधी आणून हजार रुपये खर्च करावे लागत होते आता मोफत औषध उपचार व लसी देण्यात येत आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नमिता मुंदडा यांनी…

Read More

रमेश आडसकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची केली पहाणी; संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क; नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन; केज- बीड जिल्ह्याचे जेष्ठ नेते, रमेश आडसकर यांनी केज तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पहाणी करून संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून जलद गतीने शेतीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर कराव्या अशी मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून केज तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतात तळ्यांचे स्वरूप आले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाले आहेत. रा. कॉ. पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी संपूर्ण केज तालुक्यात दौरा करून पायी शेतकर्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन…

Read More

जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या हस्ते मांजरा धरणाचे जलपूजन संपन्न; मांजरा धरण भरल्याचा आनंद आहे; अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेणार- रमेशराव आडसकर केज- धनेगाव येथील केज सह अंबाजोगाई, लातूर येथील जलवाहीनी समजले जाणारे मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. हा एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब असून शेतकरी बांधववर निसर्गाची कृपा कायम रहावी असे उद्गार रमेशराव आडसकर यांनी धनेगाव येथील मांजरा धरणाच्या जलपूजन करते वेळी व्यक्त केले. मागील काही दिवसांत भरपूर पाऊस झाल्याने अनेक शेतकर्यांचे पिक गेले आहेत. त्यांचे पंचनामे करणे सुरू आहे. मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून…

Read More

मांजरा धरण ८२.७८% भरले ! दर तीन तासाला धरणाच्या पाणी पातळीचे अपडेट्स; गौतम बचुटे/केज :- बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाचे समजले जाणारे मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प हा आज सकाळी ९.०० वाजता मिळालेल्या माहिती नुसार ८२.७८ टक्के भरला असून धरण पूर्ण भरायला केवळ ०.७२ मीटर बाकी असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. या वर्षी झालेल्या मे महिन्यातील मान्सून पूर्व पावसाने मांजरा प्रकल्पात २५ टक्के जलसाठा होता. मात्र त्या नंतर १४ ऑगस्ट पर्यंत मांजरात अवघा ३६ टक्केच एवढा जलसाठा होता. त्यामुळे अर्धा पावसाळा संपत आलेला असला तरी आता धरण भरते की नाही…

Read More

मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली; मांजरा प्रकल्पात ६५% पेक्षा जास्त जलसाठा गौतम बचुटे/केज :- बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेतकरी आणि पाणी पुरवठा यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना महत्वाचा असलेला मांजरा प्रकल्प रात्री झालेल्या सर्वदूर पावसाने ६५.% पेक्षा जास्त भरला आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांच्या शेती बरोबरच तीन जिल्ह्यातील लोकांची तहान भागविणारा बीड जिल्ह्यातील महत्वाचा समजला जाणारा धनेगाव येथील मांजरा प्रकल्प हा रात्री सर्वदूर पडलेल्या दमदार पावसाने ६५.८४% भरले असल्याची माहिती प्रकल्पाचे अभियंता यांनी दिली आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वदूर दमदार पावसाने मांजरा प्रकल्पात मागील २४ तासात झालेल्या पावसाने ७.९१६ दशलक्ष घन मिटर…

Read More

स्व.संतोष देशमुखांच्या पाणी क्रांतीला राष्ट्रीय मान्यता”; मस्साजोगच्या विद्यमान सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहणाचे निमंत्रण; केज- स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी केज तालुक्यातील मस्साजोग येथील महीला सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे पती आनंदराव सोनवणे यांना केंद्र सरकारच्या वतीने निमंत्रित केले आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांनी हे निमंत्रण पत्र शासकीय कर्मचारी यांच्या वतीने सरपंच वर्षा सोनवणे यांचे कडे सुपुर्द केला आहे. यावेळी धनंजय देशमुख व सरपंच पती आनंदराव सोनवणे हे उपस्थित होते. दिल्ली येथे १५ ऑगस्ट ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित रहाणार्या महाराष्ट्रातील एकमेव सरपंच आहेत. स्व. सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या पाणीदार शिवार व आदर्श ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबविलेल्या अनेक विकास…

Read More