Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

चार लाख रु. असलेली पिशवी हिसकावून फरार झालेले आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात ! आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 11, 2025Updated:September 11, 2025No Comments3 Mins Read

चार लाख रु. असलेली पिशवी हिसकावून फरार झालेले आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात !

आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

गौतम बचुटे/केज :

केज येथील सरकारी दवाखान्या जवळ चार लाख रु पिशवीत ठेवून मोटार सायकवरून गावाकडे जात असलेल्या ऊसतोड मुकादमाच्या हातातील चार लाख रु. असलेली पिशवी, मोटार सायकल वरून आलेल्या दोघांनी हिसकावून घेत पळून गेलेल्या आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टी भागातील आरोपींना परभणी येथील कारागृह प्रशासना कडून ताब्यात घेत प्रकरणाचा तपास लावला आहे.

२९ जुलै रोजी केज येथून तिघेजण चार लाख रु. घेऊन आडस जवळील मानेवाडीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर केज येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालया जवळ मोटार सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ४ लाखाची रक्कम असलेली हातातील पिशवी हिसकावून घेत पळून गेले होते. केज पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज आधारे धाडसी चोरीची घटना उघडीस आणली. जसवंत उर्फ जश्यु शिवा पिटला वय (१८ वर्ष) आणि प्रसंगी उर्फ सन्नी एलिया चल्ला वय (३३ वर्ष) हे दोघेही आंध्रप्रदेशातील किनारपट्टी भागातील नेल्लोरे जिल्ह्यातील कप्पारालथिलप्पा ता. कावली येथील रहिवाशी असून त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे आणि पोलिस कॉन्स्टेबल बजरंग मुंडे आणि संदीप माळी यांनी त्या दोघांना दिनांक १० सप्टेंबर रोजी परभणी येथील जिल्हा कारागृहातून न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतले आहे.

या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि. २९ जुलै मंगळवार रोजी केज तालुक्यातील उत्तरेश्वर उत्तम धायगुडे (रा. मानेवाडी ता. केज) हे त्यांचे मेहुणे रमेश वैजेनाथ माने याने त्यांना देण्यासाठी अंबाजोगाई येथील आयडीबीआय बँकेतून चेकद्वारे काढलेले चार लाख रु. घेऊन केज येथे आले होते. उत्तरेश्वर धायगुडे यांच्या सोबत त्यांचा मेव्हणा रमेश माने आणि पुतण्या अशोक धायगुडे हे तिघे मोटार सायकली वरून चार लाख रु. पांढऱ्या रंगाच्या कॅरी बॅगमध्ये घेऊन केज येथे आले होते. ते चार लाख रु. त्यांना केज येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंबाजोगाई रोड वरील पेट्रोल पंपा समोर असलेल्या शाखेत जमा करून आरटीजीएस द्वारे कोल्हापुर येथील शिरोली एमआयडीसी मधील विवेक इंजिनिरींग वर्कस यांच्या खात्यावर नवीन ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉली खरेदीसाठी पाठवायचे होते. परंतु त्यांना केजला यायला उशीर झाल्याने बँकेचा व्यवहार बंद झाल्यामुळे ते तिघे दुपारी ४:३० वा. च्या सुमारास मोटार सायकल वरून त्यांच्या गावी मानेवाडीकडे जाण्यासाठी निघाले होते. ते तिघे केजच्या बाहेर आल्या नंतर एका पुला जवळ लघुशंकेला थांबले. त्या नंतर ते गावाकडे जात असताना उत्तरेश्वर धायगुडे हे हात चार लाख रुपये असलेली पिशवी घेवुन मोटार सायकलवर सर्वात पाठीमागे बसले होते. ते तिघे अंबाजोगाई रोडने जात असताना केज येथील उपजिल्हा रुग्णालया पासून २०० मिटर अंतरावर असताना त्यांच्या पाठी मागुन एक भरधाव वेगात मोटार सायकल आली. त्या मोटार सायकलवर दोन तरुण बसलेले होते. त्यातील पाठी मागे बसलेल्या एकाने उत्तरेश्वर धायगुडे यांच्या हातातील चार लाख रुपये असलेली पांढऱ्या रंगाची कॅरीबॅग हिसकावुन घेतली आणि वेगात अंबाजोगाईच्या रस्त्याने निघुन गेले होते. तेव्हा उत्तरेश्वर धायगुडे यांनी आरडा ओरड करून त्या त्यांचा दोन कि मी पर्यंत पाठलाग केला, पण ते त्यांना सापडले नव्हते.

उत्तरेश्वर धायगुडे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात वाटमारी करून चार लाख रु. हिसकावून घेऊन पळून गेलेल्या दोन अनोळखी तरुणा विरुद्ध गु. र. नं. ४१५/२०२५ भा. न्या. सं. ३०४(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे हे तपास करीत होते.
____________________

पोलिस निरीक्षक स्वप्नील यांनी प्रसार माध्यमांना दिलेली माहिती खरी ठरली :- या चोरीच्या तपासा संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी शहरात मुख्य चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आधारे पोलिस तपास करीत आहेत. असे म्हटले होते आणि लवकरच हे आरोपी ताब्यात येतील. अशी आशा व्यक्त केली होती.
____________________

आणखी गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता :- अशा प्रकारच्या चोरीच्या घटनेचा या दोघांचा समावेश आणि सहभाग आहे काय? याचा केज पोलिस तपास करीत असून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
____________________

पाच दिवसांची पोलिस कोठडी :- दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने त्यांना दि. १५ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 128
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.