अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली पोलीस : आई वडिलांचे स्वप्न झाले साकार ! हातातला कोयता खाली टाकून आता हाती आली लाठी ! गौतम बचुटे/केज :- आई अंगणवाडीत खाऊ शिजविण्याचे काम करीत असून वडील एक ऊसतोड कामगार असताना काजल शिनगारे हिने आपल्या प्रयत्न आणि बुद्धीच्या जोरावर मुंबई पोलिसात भरती होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. केज तालुक्यातील कोरेगाव येथील काजल शिनगारे ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नाही. तिची आई उर्मिला पायाळ-शिनगारे ही अंगणवाडीतील मुलांना खाऊ शिजवून वाटपाचे काम करीत आहे. तर वडील हे ऊसतोड आणि रोजी रोजंदारी करीत आहेत. काजल हिनेही आई वडिलांना मदत करण्यासाठी…
Author: विजयराज आरकडे
लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त आडस येथे होणार सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर – रमेशराव आडसकर केज (प्रतिनिधी) सत्तरच्या दशकातील केज, अंबाजोगाई तालुक्यातील सहकार, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विकासाची गंगा खेचुन आणणारे लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या कामाच्या माध्यमातून अजुनही शेतकरी, शेतमजूर यांच्या मनात कायम स्मृती आहेत.त्यांचा हाबाडा हा शब्द संपुर्ण महाराष्ट्रात गाजला होता. लोकनेते माजी आमदार स्व. बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त दि.12/8/2025 मंगळवारी छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर होणार असुन सकाळी अकरा वाजता ह.भ.प.भगवान महाराज वरपगांवकर यांचे पुण्यतिथी निमित्त किर्तन होणार…
विस्तार अधिकारी विजयकुमार मस्के आणि कनिष्ठ सहाय्यक उषा चाटे-गित्ते यांचा सत्कार गौतम बचुटे/केज :- केज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजयकुमार मस्के आणि कनिष्ठ सहाय्यक उषा चाटे-गित्ते यांचा सत्कार करण्यात आला. या बाबतची माहिती अशी की, गेवराई पंचायत समिती येथून पदोन्नती झालेले विजयकुमार मस्के हे केज पंचायत समितीच्या पंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. तर चिंचोली माळी येथे पूर्वी परिचर म्हणून सेवारत असलेल्या उषा चाटे-गित्ते यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती झालेली असल्याने. त्या सुद्धा केज पंचायत समितीला कनिष्ठ सहाय्यक पदावर रुजू झालेल्या आहेत. त्या बद्दल पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, मित्र आणि गावकऱ्यांच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक…
केज बस स्टँडवरून रुद्राक्ष देऊन ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लांबविली ! गौतम बचुटे/:- केज येथील बस स्टँड वरून बसची चौकशी करणाऱ्यांसाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या वृद्ध प्रवाशाला गोड बोलून त्याला रुद्राक्ष देऊन त्याच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. आवळा देवून कोहळा काढणे अशी मराठीत म्हण आहे. तसाच एक प्रकार केज येथील बस स्टँडवर घडला आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वा. च्या सुमारास लातूर जिल्ह्यातील रामेश्वर येथील सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी पंढरीनाथ बळवंत हे त्यांच्या टाकळी ता. केज येथील मुलगी निर्गुणा माने हिच्या सोबत धारूरला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर आले होते. केज…
महसूल अभियानात केज तालुका अव्वल; उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे आणि राकेश गिड्डे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास ! गौतम बचुटे/केज :- केज तहसीलच्या वतीने शासनाचे विविध उपक्रम राबवित असताना तालुक्यातील नागरिक आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार राकेश गिड्डे हे काम करीत असल्याने सामान्य नागरिक त्यांच्या कार्यपद्तीवर खुश आहेत. केज तहसीलदार राकेश गिड्डे आणि त्यांची सर्व टीम ही केज तालुक्यात अत्यंत चोखपणे काम करीत आहे. राकेश गिड्डे यांनी तालुक्यातील मतदार नोंदणी, तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्या आहेत. तसेच त्यांना मार्गदर्शन करीत असलेले अंबाजोगाई विभागाचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. केज तहसीलच्या वतीने तालुक्यातील बनसारोळा, विडा, सोनेसांगवी…
आदित्य पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड —- एक नेतृत्वशील युवकाचे महाराष्ट्रातून होत आहे अभिनंदन केज — भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीच्या सरचिटणीस पदावर आदित्य पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही निवड पक्षाच्या भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल असून तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या काँग्रेस पक्षाच्या धोरणाची ही ठळक निशाणी आहे. —————————— आदित्य पाटील यांची राजकीय कारकीर्द —————————— आदित्य पाटील हे अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिक स्तरावरून सुरू झालेला हा प्रवास आता राज्यस्तरावर पोहोचलेला आहे. त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस, आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये विशेष कामगिरी केली आहे. ग्रामीण…
अज्ञानाच्या ‘अ’ पासून आश्चर्याच्या ‘आ’ पर्यंत घेवून जाण्याचं काम सद्गुरु करतात- समाधान महाराज शर्मा; केज येथील रामकृष्ण परमहंस परिवाराचा गुरुपोर्णिमा उत्सव आनंदात संपन्न; केज/प्रतिनिधी — केज येथील प.पू.वै.वासुदेव खंदारे गुरुजींच्या कृपाशिर्वादाने चालत आलेला गुरुपोर्णिमा उत्सव यावर्षी देखील विठाई मंगल कार्यालय केज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खंदारे गुरुजींच्या वृंदावन धाम या निवासस्थानी ठाकुर रामकृष्ण परमहंस,शारदा माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व नंतर वृंदावन धाम येथून प.पू.वै. खंदारे गुरुजींच्या पादुका पालखी मध्ये ठेवून विठाई मंगल कार्यालया पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमस्थळी खंदारे गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुरुमाई खंदारे आईंची पाद्य पुजा करण्यात…
डिजिटल मिडिया परिषदेचा सप्टेंबरमध्ये संभाजीनगर येथे राज्यव्यापी मेळावा; मुंबई : डिजिटल मिडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा पहिला राज्यव्यापी मेळावा 14 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली..मेळाव्याचे उद्घाटन राज्यातील पत्रकारांचे नेते एस.एम.देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.. अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार राज्यभर झपाट्याने होत आहे.. राज्यातील 30 जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू झाल्या आहेत.. सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी एक राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.. या मेळाव्यात राज्य कार्यकारिणीची घोषणा होणार असून उत्कृष्ट युट्यूब चॅनल आणि पोर्टल…
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाभार्यास विड्याच्या पानांची सजावट श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केज( प्रतिनिधी) तालुक्यातील प्रतिदेहु श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गरूपोर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाभारा हजारो विड्याच्या पानांनी सजवण्यात आला. संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमे निमित्त आलेल्या भक्तांनी संत तुकाराम महाराजांच्या दर्शना बरोबरच गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे आशीर्वादही घेतले. याप्रसंगी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची किर्तन सेवा संपन्न झाली. पावनधाम येथे आलेल्या हजारो भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था सौ.स्मिता चंद्रकांत…
गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी साजरी नांदेड प्रतिनिधी नांदेड शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेवी होळकर नगरी खंडोबा चौक तरोडा बु नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शाळेच्या वतीने पंढरपूरचे देवस्थान विठ्ठल रुक्माई च्या तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांकडून फुगडी रिंगण टाळ मृदुंगासह यांचा आनंद लुटला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आषाढी एकादशीच दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक श्री कल्याणकर दिगंबर,जाधव सूर्यकांत, शोभा किडे, संध्या सिंदगीकर,सुग्रीव मोरे आदी पालक उपस्थित होते.