केजच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कुशल नेतृत्व–
अंकुशराव (अण्णा) इंगळे
वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव;
केज : केजसह संपूर्ण तालुक्यात परिचित असलेले राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून अंकुश अण्णा इंगळे यांची ओळख आहे. आडसकर कुटुंबाशी त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याने स्व. माजी आमदार बाबूरावजी आडसकर साहेब यांच्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास स्व. मेघराज आडसकर आणि सध्या मा. रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजही अविरत सुरू आहे.
केज तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रश्नांची सखोल जाण ठेवून ते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने अग्रेसर राहिले आहेत. केज ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती केजचे उपसभापती अशी विविध महत्त्वाची पदे त्यांनी यशस्वीपणे भूषविली आहेत.
सध्या ते केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कार्यरत असून गेल्या दोन दशकांपासून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच मार्केट यार्ड परिसरात व्यापार व व्यवसाय वृद्धीसाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
केज शहर व तालुक्यातील विविध विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून सर्वसामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद, मनमिळावू स्वभाव, हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि जनतेच्या अडचणी सोडविण्याची तळमळ यामुळे त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आज, दि. १६ जून रोजी अंकुश अण्णा इंगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
