लिओ लेडीज़ जिमचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
केज-
केज मधील एकमेव लेडीज़ साठी प्रसिद्ध असलेली लिओ लेडीज़ जिमचा प्रथम वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
मा.सीताताई बनसोड मॅडम नगराधक्षा केज यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिमच्या संचालिका सौ.स्नेहल विजय एखंडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचन केले.
तसेच डॉ.दिपाली बुदगुडे मॅडम यांनी महिलांना व्यायाम व आहार याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी सौ.मोनिका गिरी मॅडम, सौ.मनीषा ढोकर, सौ.सुषमा कलेकर यांनी आपले गेल्या वर्षभरात जिम मध्ये आलेल्या अनुभवांबद्दल मत व्यक्त केले.
त्यानंतर जिमचे ओनर श्री.विजय एखंडे सर यांनी जिम वर्कआउट का करायला पाहिजे तसेच आपला आहार कसा सकस असायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिम मधील सौ.रेश्मा सोळुंखे, सौ.सीमा जाजू, सौ.प्रियांका पाटील, सौ.पूजा मजमुले, सौ.दिपाली फल्ले, सौ.सुषमा बनसोडे, सौ.शामल खांडेकर, सौ.रिया एखंडे, कु.प्रतिक्षा शिंदे ,कु.सेजल बियाणी आदीं उपस्थित होत्या.
