Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रा.कॉ. पक्षाचे सभासद व्हा– रमेशराव आडसकर —————————- उजणी येथून दोन टियमसी पाणी मांजरा धरणात आणून कॅनॉल द्वारे केज तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये पोहचवून शेतकरी बांधवांची शेती वलीताखाली आणने, गाव तिथे सिमेंट बंधारे, प्रत्येक गावाला एक कोटीचा निधी, नवीन जल योजना व रस्ते, वीजपुरवठा, घरकुल योजना, सेंटर फॉर अॅण्ड ईन्कोभबीशन धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात योजना राबविणे, व कार्यकर्ता आर्थिक सक्षम व्हावा यासाठी विशेष प्राधान्य देणार —– रमेशराव आडसकर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 18, 2025No Comments3 Mins Read

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रा.कॉ. पक्षाचे सभासद व्हा–

रमेशराव आडसकर
—————————-

उजणी येथून दोन टियमसी पाणी मांजरा धरणात
आणून कॅनॉल द्वारे केज तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये पोहचवून शेतकरी बांधवांची शेती वलीताखाली आणने,
गाव तिथे सिमेंट बंधारे, प्रत्येक गावाला एक कोटीचा निधी, नवीन जल योजना व रस्ते, वीजपुरवठा, घरकुल योजना, सेंटर फॉर अॅण्ड ईन्कोभबीशन धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात योजना राबविणे, व कार्यकर्ता आर्थिक सक्षम व्हावा यासाठी विशेष प्राधान्य देणार
—–
रमेशराव आडसकर

केज-

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक, महीली, युवा कार्यकर्ते यांनी सभासद नोंदणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रा. कॉ. पक्षाचे अधिकृत सभासद होण्याचे आवाहन जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केले आहे.

रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली हा सभासद नोंदणी सोहळा केज कृ.उ.बा.स. येथे दि. १८ रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रमेशराव आडसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली रा. कॉ. पक्षात आपण सहभागी झालो आहोत.
उजणी धरणातून दोन टियमसी पाणी मांजरा धरणात आणून कॅनॉल द्वारे केज तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये पोहचवून सर्व शेतकरी बांधव यांची शेती वलीताखाली आणने, प्रत्येक गावात सिमेंट बंधारे बांधून प्रत्येक गावाला एक कोटीचा निधी, रस्ते, वीजपुरवठा, घरकुल योजना मागेल त्याला विहीर उपलब्ध करून देणे,

सेंटर फॉर ऍन्ड ईन्कोभबीशन या धर्तीवर संपूर्ण जिल्यात योजना राबविणे, कार्यकर्ता आर्थिक सक्षम करण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
आपल्या भागात अनेक योजना, विकासाचे कामे आणून शेतकरी, कामगार, कार्यकर्ते यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत. मा. अजितदादांनी आपल्यावर विश्वास ठेऊन जी संधी दिली आहे ती संधी जनतेच्या सेवेसाठी कायम ठेवायची आहे.
स्व. आ. आडसकर तात्या पासून आमच्या पिढीपर्यंत आडसकर कुटुंबाने कार्यकर्तांना बळ देऊन अनेक राजकीय पदावर बसवले आहे.
यापुढेही ही परंपरा कायम ठेवली जाईल.
पुढे बोलताना रमेशराव आडसकर म्हणाले की, रा. कॉ. पक्षात सर्व जातीधर्मातील चांगले कार्यकर्ते, नेते यांना सोबत घेऊन काम करणार असून आपल्या जिल्ह्याची खराब खराब होत चाललेली प्रतिमा सुधारणे हे आपले सर्वांचे काम असल्याचे ही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
तसेच केज तालुक्यातील सर्वच गावातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने रा. कॉ. पक्षाचे सभासद होण्याचे आवाहन केले आहे.

रा. कॉ. पक्षाचे जि. अ. राजेश्वर अबा चव्हाण यांची अध्यक्ष म्हणून या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. ते बोलताना म्हणाले की,
केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव तालुक्यातील एक उमदा नेतृत्व म्हणून पाहिले जाणारे व लोकांत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवीणारा नेता म्हणून ओळखले जाणारे रमेशराव आडसकर यांच्याकडे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता रा. कॉ. धुरा सांभाळायला दिली असून. नेते, कार्यकर्ते, नागरीक व महिला यांनी रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागात विकासात्मक कामे करण्यासाठी रा. कॉ. सदस्य नोंदणी करून एकजुटीने काम करावे असे मत रा. कॉ. पक्षाचे जि. अ. राजेश्वर अबा चव्हाण यांनी मांडले .
यावेळी राजेभाऊ औताडे ता. अ. रा. कॉ.अंबाजोगाई,
अंकुशराव इंगळे सभापती कृउबासकेज,क्षॠषीभैय्या आडसकर सदस्य जि. म. बॅंक, जेष्ठ नेते रा. कॉ. ईश्वर मुंडे , लक्ष्मीकांत लाड, प्रशांत देशपांडे, राऊत नाना गुरूजी, मा. मु. मुजाफर इनामदार, डॉ. जलालभाई इनामदार, नगरसेवक अझहर इनामदार, मा. नगरसेवक अमरभैय्या पाटील, दिलीपराव गुळभिले, शुशिल भैय्या अंधारे, मा. जि. प. सदस्य, भारतराव गालफाडे, भागवत नेटके, ओमसेठ भुतडा, शिवदास थळकरी,
तसेच केज तालुक्यातील ग्रा. प. सरपंच, उमेदवार, सोसायटी सदस्य, यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. नगरसेवक जयसिंग देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत लाड यांनी मानले.

विजयराज आरकडे

Post Views: 110
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.