केज शहरात भरधाव कंटेनेरने अनेकांना अनेकांना धडकीवले;
एक महिला जागीच ठार तर अनेक जण गंभीर जखमी
केज-
आज दि. १६ रोजी तिन च्या सुमारास मांजरसुंबा मार्गी आलेले एका कंटेनेरने शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक पायी चालणारे नागरिक व वाहनांना धडीकी देत पुढे जात असल्याचे दिसून आले. यात मिना घोडके या महीलेचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
अनेक वाहनाचे नुकसान झाले आहे.
पुढे चंदनसावर, लोखंडी येथेही अनेक वाहन, नागरिक, यांना या कंटेनेरने धडकी दिल्या आहेत. यानंतर हा कंटेनर लोखंडी सावरगाव जवळ उलटला असल्याचे समजत आहे.
जखमींना रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस प्रशासन रुग्णवाहिका व नागरीकांनी तातडीने हालचाली केल्या आहेत.
