शारदा इंग्लिश स्कूल केज येथे NEET ची परीक्षा सुरळीतपणे पडली पार;
केज येथे परिक्षा केंद्र मिळाल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त
केज –
केज शहरातील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या शारदा ईंग्लिश स्कूल या नामांकित शाळेमध्ये यावर्षी पहील्यांदाच NEET 2025 परिक्षा झाली. अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली.
मेडिकल क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणून Neet परीक्षेकडे सध्या अनेक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर ओढा आहे. यामुळे या परीक्षेला प्रत्येक केंद्रावर तोबा गर्दी होत असते. यावर्षी पहिल्यांदाच केज शहरामध्ये देखील ही परीक्षा झाली. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या शारदा ईंग्लिश स्कूल या नामांकित शाळेमध्ये चोख पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे. सुसज्ज, टोलेजंग इमारत आणि उत्तम नियोजन यामुळे या ठिकाणी 480 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे. केज शहरामध्ये यावर्षी शारदा ईंग्लिश स्कूलमध्ये हे परीक्षा केंद्र आल्यामुळे या भागातील विद्यार्थी आणि पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
