आत्तम राठोड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये बीड जिल्ह्यातून प्रथम
केज दि.२५(प्रतिनिधी) तालुक्यातील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित होळ येथील श्री होळेश्वर विद्यालयाचे शिक्षक आत्तम राठोड यांनी ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सलग ३ वर्ष राष्ट्रीय पातळीवर आणि चौथ्या वेळेस बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता ते अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान शिबिरात सहभागी होतील.
त्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक संजय पालकर, मुख्याध्यापक नंदा गोरे, मुख्याध्यापक देवानंद मुलदोडे, बाळासाहेब खोगरे उपस्थित होते. उत्तम राठोड यांनी टाकाऊ साहित्यापासून शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. त्यांच्या या प्रयोगाला पारितोषिक मिळाले आहे. दरम्यान, आत्तम राठोड हे प्रयोगशील शिक्षक आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकदा विज्ञान प्रदर्शनात पारितोषिके मिळविलेली आहेत. त्यांची विज्ञानपेटी गाजली होती.
———————-