Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वाल्मीक कराड यांच्या जामीन प्रकरणाला नाट्यमय वळण !* *वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज माघारी !*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 23, 2025No Comments2 Mins Read
*वाल्मीक कराड यांच्या जामीन प्रकरणाला नाट्यमय वळण !*
*वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज माघारी !*

 

गौतम बचुटे/केज :-
वाल्मीक कराड यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन प्रकरणाला आज नाट्यमय वळण मिळाले असून आरोपीच्या वकिलाने सादर केलेला जामीन अर्ज माघारी घेतला.
या बाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आणि मकोका अंतर्गत न्यायालयीन कोठडीतील आरोपी वाल्मीक कराड यांच्यावरील आवादा एनर्जी या पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचा आरोप असून खंडणी प्रकरणी देखील त्यांना न्यायालयीन कोठडीत मिळालेली आहे. खंडणी प्रकरणी आज दि. २३ जानेवारी त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी होणार होती.
दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता सरकारी वकील ॲड. जितेंद्र शिंदे, आरोपींचे वकील ॲड. अशोक कवडे आणि सीआयडीचे तपासी अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हे सर्वजण केज येथील ‘ क ‘ स्तर दिवाणी न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात हजर झाले. त्या नंतर जामीन अर्जावर सुनावणी सुरू होण्या पूर्वीच आरोपीचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी मा. न्यायालया समोर जामीन अर्ज माघारी घेण्या संबंधी विनंती अर्ज सादर करून जामीन अर्ज मागे घेतला.
त्यामुळे वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणी जामीन मिळतो की नाही ? अशी चर्चा सुरू होती ती थांबली आहे. मात्र जामीन अर्ज मागे का घेतला हे समजू शकले नाही.
————————————————–
*तारीख पे तारीखला ब्रेक :-*
वाल्मीक कराड यांच्या जामीन अर्जावर दि. १८ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. त्या नंतर त्यांचे वकील यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांनी पुढील सुनावणी ही दि. २० जानेवारी रोजी ठेवण्यात आली होती. मात्र २० जानेवारी रोजी देखील आरोपींच्या वकिलाने तारीख पुढील तारखेची विनंती केली. त्यामुळे जामीन अर्जावर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता वाल्मीक कराड याच्या जामीन प्रकरणी जमिनीचा अर्जच मागे घेतला असल्याने जामीन प्रकरणाला ब्रेक मिळाला आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 212
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 2
Total Users : 146042
Views Today : 15

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.