Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी दिव्यांग तरुणाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 17, 2025No Comments2 Mins Read
वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या
या मागणीसाठी दिव्यांग तरुणाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

 

गौतम बचुटे/केज :- वाल्मीक कराड यांच्यावरचे सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
या मागणीसाठी केज तालुक्यातील नाव्होली येथील एक दिव्यांग तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्याच्या समर्थनार्थ गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन देखील केले.
या बाबतची माहिती अशी की, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील नाव्होली येथील नानासाहेब भानुदास चौरे या दिव्यांग तरुण सकाळी नाव्होली ते राजेगाव फाटा तेथील पाण्याच्या टाकीवर चढून बसला होता. नानासाहेब चौरे हा हात आणि पायाने दिव्यांग आहे. जो पर्यंत वाल्मीक कराड यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेवून त्यांना येथे आणले जात नाही तो पर्यंत मी खाली उतरणार नाही.
अशी त्याची मागणी होती.
माहिती मिळताच आंदोलनस्थळी तहसीलदार राकेश गिड्डे, पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि मंडळ अधिकारी.सुहास डोरले हे दाखल झाले. त्यांनी नानासाहेब चौरे याच्याशी संपर्क करून खाली उतरविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तो कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. त्या नंतर प्रशासनाच्या वतीने त्याची आई केराबई चौरे हिला तेथे आणून तिने देखील त्याला खाली येण्यासाठी सांगितले. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.
शेवटी सायंकाळी ६:०० च्या सुमारास पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड आणि स्थानिकचा तरुण गोविंद बिक्कड यांनी स्वतः टाकीवर चढले आणि त्यांनी त्याची समजूत काढली. त्या नंतर नानासाहेब चौरे हा खाली उतरला.
यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बंगार, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक मतीन शेख, पोलीस नाईक शेख रशीद, पोलीस नाईक शिवाजी कागदे, पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि दंगल प्रतिबंधक पथक हजर होते.
————————-
रस्त्यावर टायर पेटवून गावकऱ्यांचा रस्ता रोको :-
नाना चौरे नावाचा एक तरुण पाण्याच्या टाकीवर चढलेला असून त्याला समर्थन देण्यासाठी गावकऱ्यांनी राजेगाव फाट्यावर रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले.
विजयराज आरकडे

Post Views: 104
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 3
Total Users : 147133
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.