Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन केले सन्मानित;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 17, 2025No Comments3 Mins Read
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन केले सन्मानित;

 

केज/प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन केले सन्मानित करण्यात आले.केज शहराच्या विकासासाठी अहोरात्र तत्पर असल्याचे प्रतिपादन
हारूणभाई इनामदार यांनी केले आहे. यापुढे शहरातील शंभर बचत गटाला व्यवसायासाठी निधी केज नगरपंचायत च्या माध्यमातून उपलब्ध करणार करणार आहोत असे नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी बोलताना सांगितले आहे.
सावित्रीबाई फुले व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत. जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या संकल्पनेतून समाजातील सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक, अध्यात्मिक,शैक्षणिक,क्रीडा, वैद्यकीय,प्रशासकीय,पत्रकारिता, उद्योजक, संशोधन, गायन इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूणभाई इनामदार, गटनेते भाऊसाहेब गुंड, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, नगरसेवक खैसरभाई इनामदार, नगरसेविका सौ. पद्मिनी अक्का शिंदे,नगरसेविका सौ.पल्लवीताई रांजणकर, नगरसेवक बाळासाहेब गाढवे, नगरसेवक मुस्तफा शेट खुरशी, नगरसेवक युनूसभाई शेख, युवा नेते लखन हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूपदीपाने पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे जनविकास परिवर्तन आघाडीच्या व केज नगरपंचायतच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शहरातील १० बचत गटाला केज नगरपंचायत च्या पुढाकारातून आयसीसी बँके कडून ८० लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे पत्र देऊन बचत गटांच्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना हारुणभाई इनामदार यांनी सांगितले की, केज शहरातील अनेक मुख्य रस्त्याचे व गल्लीतील रस्त्याचे कामे करण्यात आली आहेत. त्याचबरोबर बाराशे घरकुल मंजूर करून आणले आहेत दोनशेहून अधिक घरकुलाचे कामे चालू आहेत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत तर उर्वरित घरकुलांची कामे देखील लवकरच चालू करण्यात येणार आहेत. पुढे बोलताना इनामदार म्हणाले की, केजच्या भूमीमध्ये जन्म घेऊन विविध क्षेत्रांमध्ये अनेक मान्यवरांनी कौतुकास्पद कार्य करून केजची मान उंचावली आहे त्यांचा सन्मान करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‌पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे व त्यांचा गुणगौरव करण्याचा आम्हाला योग आला व आमच भाग्य मोठे आहे की, आम्हाला सर्वांची सेवा करण्याचा एक योग आला आहे. केज शहराच्या विकासासाठी आमची जनविकास परिवर्तन आघाडी आम्ही अहोरात्र तत्पर आहोत शहराच्या विकास कामासाठी आम्ही कुठेच कमी पडणार नाहीत असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड म्हणाल्या की, महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करून स्वतः स्वतःच्या पायावर उभा टाकावे नगरपंचायत च्या माध्यमातून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही करण्यास कटिबद्ध आहोत. महिलांना व्यवसाय करण्यासाठी विविध बँकेचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी नगरपंचायत सक्षम आहे परंतु महिलांनी कर्जाची परतफेड वेळेत करावी जे बचत गट वेळेत कर्ज फेडतील त्यांना लागेल तेवढे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापुढे शंभर बचत गटाना नगरपंचायत च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की, मागील तीन वर्षापासून नगरपंचायतची सत्ता आमच्या हाती आल्यापासून आम्ही केज शहराचा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे. यापुढेही राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने प्रा.डॉ.हनुमंत सौदागर प्रा.डॉ.शंकर वाघमारे,
प्रा.डॉ.बी.जे. हिरवे, डॉ.ह.भ.प. छत्रभुज वायबसे, पत्रकार रामदास तपसे, तात्या गवळी, दशरथ चवरे, श्रीमती जनाबाई खाडे, प्रा.डॉ. नवनाथ काशीद, अनिल वैरागे, दत्तात्रय मजमुले, सामाजिक कार्यकर्त्या तसलीम शेख, श्रीमती पूजा शिरसाट, श्रीमती संगीता खंडाळे यांच्यासह ३४ मान्यवरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी केज नगरपंचायतचे नगरसेवक, कर्मचारी, पत्रकार बांधव, जनविकास परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि बचत गटाच्या महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयराज आरकडे

Post Views: 107
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 1
Total Users : 146041
Views Today : 14

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.