सरस्वती महाविद्यालयात विद्यापीठ नाम विस्तार दिन साजरा
केज-(प्रतिनिधी)
उपेक्षित, वंचित, गरीब, मजूर,शेतकरी यांच्या प्रवाहा बाहेरील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची द्वारे मराठवाड्यासारख्या अविकसित भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून खुली केली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नाम विस्तार दलित, उपेक्षित आणि बहुजनांचा विचाराचा विजय असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय केज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विस्तार दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पाटील हे होते.
अध्यक्ष समारोपप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, विद्यापीठाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे ही फक्त बाबासाहेबांना नव्हे तर विद्यापीठासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास प्रा डॉ आहेर,प्रा डॉ चाटे,प्रा डॉ शिंदे,प्रा डॉ आरडले,प्रा डॉ वराळे,प्रा डॉ कराळे आदींची होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. किरणकुमार धिमधिमे तर आभार प्रा. डॉ. सारिका बुरगे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.