*केज शहरात दिव्यांग मतदार जनजागृती रॅली संपन्न…*
केज/प्रतिनिधी—-
आज केज विधानसभा मतदारसंघ 232 (अ.जा.) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.यावेळी रॅलीचा शुभारंभ तहसिल कार्यालय केज येथून तहसिलदार मा.गिड्डे साहेब, तहसिलदार मा.तरंगे साहेब,पंचायत समिती बी.डी.ओ.दिवाणे मॅडम,मा.तालुका गटशिक्षण अधिकारी मा.बेडसकर साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रॅलीचे आयोजन जिल्हा समाजकल्याण कार्यालय बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाने आपल्या हक्काचे मतदान करावे,मतदान आपला अधिकार आहे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये असे आवाहन करण्यात आले.या रॅली मध्ये मुख्याध्यापक श्री.विनायक ठोंबरे सर,मुख्याध्यापिका जाधव मॅडम,मुख्याध्यापिका सुर्यवंशी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते.
रॅलीचा तहसील कार्यालय केज येथून शुभारंभ होवून छत्रपती शिवाजी महाराज चौक- मेन रोड-बस स्टॅण्ड मार्गे परत तहसील कार्यालय केज येथे समारोप झाला.
