Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

एचपीएम कंपनी आणि  गलथानपणामुळे केजजवळील टोल नाक्यावर दोन अपघात ! अपघाताला जबाबदार असलेल्या एच पी एम कंपनी  गुन्हा दाखल करण्याची मागणी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेOctober 19, 2024No Comments4 Mins Read

एचपीएम कंपनी आणि  गलथानपणामुळे केजजवळील टोल नाक्यावर दोन अपघात !

 

अपघाताला जबाबदार असलेल्या एच पी एम कंपनी  गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

गौतम बचुटे/केज :-

केज येथील टोल नाक्यावर रस्त्यावर टाकलेला मातीचा ढिगारा आणि सिमेंट काँक्रिटच्या अवशेषांच्या ढिगाऱ्याला धडकून भीषण अपघात झाला. अपघातात कारने दोन-तीन पलट्या खाल्ल्या. यात दोन महिने वयाच्या मुलीचा हात तुटला आहे. तर चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मुलीची आई, पाच वर्षाची मुलगी, आजी, मुलीचा चुलता हे गाडीतील सहाजण जखमी झाले आहेत. तर त्याच ठिकाणी टोल नाक्याच्या दुसऱ्या बाजूला याच अपघातात नंतर पंधरा मिनिटाच्या अंतराने दुसरा अपघात झाला. त्यात चालक जखमी झाला असून या टोल नाक्याचे काम सुरू असताना रस्ता सुरक्षा किंवा रहदारी बाबत कोणतीही सूचना फलक लावलेले नसून रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समजण्यासाठी दिवे किंवा साईन-ग्लो बोर्ड लावलेले नसल्याने येथे अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम करणारी एच पी एम कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १८ ऑक्टोबर रोजी रात्री गुरुनाथ दत्तात्रय जाधव वय (२८ वर्ष), त्यांची भावजई प्रणिता नवनाथ जाधव वय (२४ वर्ष), पुतणी शावडी नवनाथ जाधव, द (रा. केदार वडगाव ता. मुखेड जि. नांदेड) (ह. मु. रांजणगाव (शेण पुंजी) ता. गंगापूर जि. संभाजी नगर, त्यांच्या भावजईची आई कलावतीबाई भगवान जुने वय (५२ वर्ष), सर्व रा. चालक गजानन उत्तमराव वेदपाठक वय ३५ वर्ष हे ह्युंदाई व्हेन्यु क्र. (एम एच २०/जी क्यू -२९४९) ने दोन महिन्याचे बाळ व बाळंतीण यांना घेवून संभाजीनगरकडे जात होते. रात्री १०:३० वा. च्या सुमारास केज-मांजरसुंबा रोडवर केज जवळ असलेल्या उमरी फाट्या जवळ असलेल्या टोल नाक्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगारा आणि जुना सिमेंट रस्ता उखडून टाकलेल्या अवशेषांचा ढिगारा याला धडकून कारने दोन ते तीन पलट्या खाल्ल्या. यात या कारचे प्रचंड नुकसान होवून कारचे तुकडे झाले.
या भीषण अपघातात दोन महिन्याच्या नवजात मुलीचा हात तुटला असून तिची प्रकृती गंभीर आहे. तर मुलीची आई, बहीण, आज्जी, चुलता आणि चालक हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.

तर या अपघात नंतर अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतराने टोल नाक्याच्या दुसऱ्या बाजूला रात्री १०:४५ वा. च्या सुमारास केजकडे येणारी रेनॉल्ट डस्टर ही कार क्र.(जी जे-१८/डी जी-१३००) हिचा देखील टोल नाक्यावर टाकलेल्या अडथळ्याला धडकून अपघात झाला. यात चालकाला मार लागला असून कार मधील अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.
——————————————————————-
*पोलीस अपघात स्थळी हजर :-*
दरम्यान अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरिक्षक आनंद शिंदे, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ, पोलीस नाईक शिवाजी कागदे हे अपघातस्थळी हजर झाले.
—————————————————————–

*अपघातग्रस्तांना केली मदत :- *अपघात झाल्या नंतर त्याठिकाणी असलेले ढालमारे आणि बीडहून केजकडे येत असलेले विशाल राऊत यांनी दोन्ही अपघातातील जखमींना अपघात ग्रस्त कार मधून काढून त्यांना मदत केली. तसेच विशाल राऊत याने कारमधील जखमीचा मोबाईल त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्त केला.
—————————————————————–

“अपघातातील जखमी :-*

१) दोन महिन्याची मुलगी – हात तुटून गंभीर जखमी
२) प्रणिता नवनाथ जाधव – पायाला मार
३) गुरुनाथ दत्तात्रय जाधव – छातीला मार
४) कु. शावडी नवनाथ जाधव – पायाला मार
५) कलावतीबाई भगवान जुने – पायाला मार
६) गजानन उत्तमराव वेदपाठक (चालक) – डोक्याला मार
—————————————————————–

*अपघाताला कारणीभूत असलेल्या गुन्हा दाखल करण्याची मागणी :-* या महामार्गावर अनेक दिवसा पासून काम सुरू आहे. मात्र काम करणारी एचपीएम कंपनी यांनी रहदारीची व सुरक्षित वाहतुकीची कोणतीही व्यवस्था केलेली नाही किंवा सूचना फलक व दिवे न लावता मातीचे ढिगारे टाकून अडथळे केले आहेत. त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशी यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. म्हणून या कंपनीसह महामार्ग प्राधिकरण यांच्यावरही सदोष मनुष्यवध आणि अपघात व प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

—————————————————————–

*मुलीचा हात सापडला :-* अपघात ग्रस्त गाडी हटविताना दोन महिन्याच्या मुलीचा तुटलेला हात अठरा तासा नंतर आढळून आला.

विजयराज आरकडे

Post Views: 48
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 8
Total Users : 146038
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.