

केज येथे कोजागरी पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम संपन्न;
केज-
जैन किराणा स्टोअर्स व रवी मसाले यांच्यातर्फे महीला व पुरुषांची दांडिया, संगीत खुर्ची, असे विविध प्रकारचे आनंददायी स्पर्धा
श्री महावीर जैन मंदीर येथे कोजागरी पौर्णिमा निमित्ताने घेण्यात आल्या.
या स्पर्धेत केज येथील पुरुष महीला यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यामध्ये पहिले पारितोषिक सम्मेद घेवारे, दुसरे पारितोषिक राजेभाऊ काळेगोरे व तिसरे पारितोषिक पुजा देवधारे यांनी मिळवले. यावेळी अस्मिता बापू ऐखंडे यांनी सर्व स्पर्धक व उपस्थित महीला पुरूष यांच्यासाठी विशेष मसाला दुधाचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे आयोजन राहुल भैय्या ऐखंडे यांनी केले होते तर हा आनंददायी उत्सव साजरा करण्यासाठी जितेंद्र देवधारे, रोनक ऐखंडे, राजेभाऊ काळेगोरे, मणिषा ढोकर, सिमा काळेगोरे, रिया ऐखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
